• मुखपृष्ठ
  • राजकीय
  • क्राईम न्यूज
  • आरोग्य
  • शिक्षण
  • महापालिका
  • सामाजिक
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • बातम्या
  • सांस्कृतिक

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026
  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026
  • December 2025

Categories

  • Uncategorized
  • आरोग्य
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • महापालिका
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • सांस्कृतिक

Meta

  • Log in
  • Entries feed
  • Comments feed
  • WordPress.org
newsflashmarathi.com newsflashmarathi.com
आवाज महाराष्ट्राचा
News Flash Marathi 480 News Flash Marathi 480
News Flash Marathi 480 News Flash Marathi 480
  • मुखपृष्ठ
  • राजकीय
    Purandar Airport
    Purandar Airport पुरंदर विमानतळाला ‘टेकऑफ’; डिसेंबरपासून प्रत्यक्ष कामाचा श्रीगणेशा ! ७५ टक्के जमिनीचा ताबा प्रशासनाकडे; तीन महिन्यांत निविदा प्रक्रिया पूर्ण करण्याचे नियोजन, शेतकऱ्यांना ३,६०० कोटींचे वाटप
    PMRDA
    PMRDA पुण्याच्या विकासात ‘पीएमआरडीए’ नापास; प्राधिकरणाला टाळे ठोकण्याची मागणी; महानगर नियोजन समितीच्या सदस्यांचा गंभीर आरोप; चाकण-हिंजवडीतील वाहतूककोंडी, रखडलेला विकास आराखडा आणि अपुऱ्या पायाभूत सुविधांवरून कारभारावर प्रश्नचिन्ह
    Pune Municipal Corporation
    Pune Municipal Corporation शिंदेवाडीत उभारणार १६० टीपीएच क्षमतेचे दोन अत्याधुनिक डांबरी प्लान्ट; दक्षिण पुण्यातील रस्त्यांच्या कामांना मिळणार गती; ८.९१ कोटींच्या प्रस्तावाला स्थायी समितीची मंजुरी, अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांची माहिती
    Pimpri-Chinchwad
    Pimpri-Chinchwad पीसीएमसीतील रखडलेल्या भूसंपादनाला ‘डेडलाइन’; २२ कामे ३१ ऑक्टोबरपूर्वी पूर्ण करण्याचे आदेश; पुणे-नाशिक महामार्गावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचा ‘मिशन मोड’; डीपी रस्त्यांच्या मिसिंग लिंकसाठी महापालिकेला निधीची तरतूद करण्याच्या सूचना
    Snakebite
    Snakebite सर्पदंशाविरोधात महाराष्ट्राचा निर्णायक लढा; आता प्रत्येक घटनेची नोंद बंधनकारक; सर्पदंश ‘अधिसूचित आजार’ घोषित; सरकारी-खासगी रुग्णालयांना रुग्ण, उपचार आणि मृत्यूची माहिती देणे सक्तीचे, जिल्हानिहाय नोडल अधिकारी नेमणार
    Previous Next
  • क्राईम न्यूज
  • आरोग्य
    Music Therapy
    Music Therapy संगीतातून आरोग्यसाधनेची नवी वाट; ‘सुर संजीवन’ पदविका अभ्यासक्रम १५ सप्टेंबरपासून; यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाची मान्यता; पुणे-मुंबईत ऑफलाइन, तर जगभरातील विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन शिक्षणाची सुविधा
    Cancer Research
    Cancer Research कर्करोगावरील आयुर्वेद संशोधनाची जागतिक झेप; ‘अ‍ॅस्को ब्रेकथ्रू २०२६’साठी निवड; पुण्यातील रसायु कॅन्सर क्लिनिककडून ३,३५१ रुग्णांचा अभ्यास; जीवनमान सुधारण्यासाठी ५१ टक्के रुग्णांचा आयुर्वेदाकडे कल

    Tukaram Mundhe
    Tukaram Mundhe सावजी जेवणावरील वक्तव्याने वादाची फोडणी; तुकाराम मुंढे ठाम, ‘माफी मागण्याचा प्रश्नच नाही’; नागपूरच्या प्रसिद्ध सावजी खाद्यसंस्कृतीबाबत केलेल्या टिप्पणीवरून नाराजी; कोणत्याही समाजाचा किंवा परंपरेचा अवमान करण्याचा हेतू नसल्याचे मुंढेंकडून स्पष्ट
    BHMS Doctors
    BHMS Doctors सीसीएमपी डॉक्टरांच्या स्वतंत्र नोंदणीला हिरवा कंदील; राज्यातील वैद्यकीय सेवा २४ तास बंद; महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलमध्ये बीएचएमएस डॉक्टरांना नोंदणीची परवानगी; पात्रता, निष्काळजीपणा आणि नैतिकतेच्या तपासणीसाठी सहा सदस्यीय समिती—आयएमएचा तीव्र विरोध
    Previous Next
  • शिक्षण
  • महापालिका
    Hinjawadi
    Hinjawadi हिंजवडीच्या वाहतूक कोंडीवर ‘मेगा प्लॅन’; प्रमुख चौक मोकळे, शटल सेवा अन् पावसाळी गटारांना गती; एमआयडीसी आणि पीएमआरडीएचा संयुक्त कृती आराखडा; आयटी कंपन्यांच्या वेळांत अंतर, जड वाहनांवर गर्दीच्या वेळी बंदी आणि मेट्रो स्थानकांना थेट जोडणीचा प्रस्ताव

Cyber Fraud
Cyber Fraud
newsflashmarathi.com > बातम्या > क्राईम न्यूज > Cyber Fraud खाते तुमचे अन् पैसा सायबर चोरांचा; पुण्यात ‘म्युल’धारकांवर पोलिसांचा हंटर! ‘ऑपरेशन म्युल हंट’ मध्ये २० हून अधिक खातेधारकांविरुद्ध गुन्हे; कोट्यवधींच्या संशयास्पद व्यवहारांचा पर्दाफाश, पडद्यामागील सूत्रधारांचा शोध सुरू
क्राईम न्यूज

Cyber Fraud खाते तुमचे अन् पैसा सायबर चोरांचा; पुण्यात ‘म्युल’धारकांवर पोलिसांचा हंटर! ‘ऑपरेशन म्युल हंट’ मध्ये २० हून अधिक खातेधारकांविरुद्ध गुन्हे; कोट्यवधींच्या संशयास्पद व्यवहारांचा पर्दाफाश, पडद्यामागील सूत्रधारांचा शोध सुरू

Posted by शिवराज सणस July 24, 2026
Share on
READ NEXT
Ganesh Festival
Ganesh Festival गणेशोत्सवात ‘आवाज’ मर्यादेतच; नियम मोडणाऱ्या मंडळांवर थेट कायदेशीर कारवाई; डीजे, लेझर लाइट आणि कर्णकर्कश ध्वनिक्षेपकांवर पोलिसांची करडी नजर; विसर्जन मिरवणुकीसाठी वाहतूक आणि गर्दी नियंत्रणाचे विशेष नियोजन

पुणे : घरबसल्या कमिशन मिळविण्याच्या आमिषाला बळी पडून बँक खाते सायबर गुन्हेगारांच्या हवाली (Cyber Fraud) करणाऱ्यांभोवती आता कायद्याचा फास आवळला आहे. देशभरातील नागरिकांना ऑनलाइन गंडा घालून लुटलेली रक्कम वळविण्यासाठी वापरण्यात आलेल्या ‘म्युल बँक खात्यां’विरोधात पुणे जिल्ह्यात पुणे पोलिसांनी धडक मोहीम उघडली आहे. ‘ऑपरेशन म्युल हंट’अंतर्गत अवघ्या दोन दिवसांत २० हून अधिक खातेधारकांविरुद्ध विविध पोलिस ठाण्यांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या खात्यांमधून एक कोटी रुपयांहून अधिक संशयास्पद व्यवहार झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

सायबर चोरटे (Cyber Fraud) स्वतःच्या नावावरील बँक खात्यांचा वापर करीत नाहीत. बेरोजगार तरुण, विद्यार्थी, छोटे व्यावसायिक तसेच आर्थिक अडचणीत असलेल्या नागरिकांना काही हजार रुपयांच्या कमिशनचे आमिष दाखविले जाते. त्यांच्याकडून बँक खाते, एटीएम कार्ड, चेकबुक, नोंदणीकृत सीमकार्ड आणि इंटरनेट बँकिंगचा ताबा घेतला जातो. 

याच खात्यांमध्ये ऑनलाइन फसवणुकीतून मिळालेली रक्कम जमा करून ती वेगवेगळ्या खात्यांमध्ये वळविली जाते. पैशांचा मूळ माग लपविण्यासाठी अशा खात्यांचे अनेक स्तर तयार केले जातात.

सायबर पोर्टलवरील तक्रारींनी उघडले बिंग

राष्ट्रीय सायबर गुन्हे नोंदणी पोर्टलवर देशाच्या विविध भागांतून दाखल झालेल्या तक्रारींचे विश्लेषण करताना पुणे जिल्ह्यातील काही बँक खाती वारंवार संशयाच्या भोवऱ्यात सापडली. त्या खात्यांमध्ये फसवणूक झालेल्या (Cyber Fraud) नागरिकांचा पैसा जमा झाल्याचे निदर्शनास आले. संबंधित बँकांकडून व्यवहारांचा तपशील घेतल्यानंतर पोलिस पथकांनी खातेधारकांची प्रत्यक्ष पडताळणी केली. त्यानंतर गुन्हे नोंदविण्याचा सपाटा सुरू झाला.

तीन पोलिस आयुक्तालयांच्या हद्दीत कारवाई

पुणे ग्रामीण पोलिसांच्या हद्दीत मंचर, बारामती ग्रामीण आणि लोणावळा शहर पोलिस ठाण्यात प्रत्येकी एका खातेधारकाविरुद्ध गुन्हा (Cyber Fraud) दाखल करण्यात आला आहे. उर्वरित कारवाई पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयातील विविध पोलिस ठाण्यांत करण्यात आली. संबंधित खात्यांचा वापर देशातील वेगवेगळ्या राज्यांमध्ये झालेल्या सायबर फसवणुकीतील (Cyber Fraud) पैसा स्वीकारण्यासाठी आणि पुढे वळविण्यासाठी झाल्याचा पोलिसांना संशय आहे.

फसवणुकीच्या पैशाला ‘म्युल’ खात्यांचा आधार

शेअर बाजारात भरघोस नफा, ‘डिजिटल अरेस्ट’, घरबसल्या ऑनलाइन नोकरी, टास्क पूर्ण करून कमाई, कर्ज मंजुरी आणि रिमोट ॲक्सेस ॲप अशा वेगवेगळ्या पद्धतींनी नागरिकांना जाळ्यात ओढले जाते. फसवणूक (Cyber Fraud) झाल्यानंतर पीडित व्यक्तीने पाठविलेला पैसा थेट मुख्य आरोपीच्या खात्यात जात नाही. तो प्रथम म्युल खात्यात जमा होतो. काही मिनिटांतच ही रक्कम दुसऱ्या किंवा तिसऱ्या खात्यात पाठवून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला जातो.

‘मला माहिती नव्हती’चा दावा चालणार नाही

“माझे खाते वापरले गेले; मला गुन्ह्याची माहिती नव्हती,” असा दावा केल्याने आता खातेधारकाची सहज सुटका होणार नाही. पैशांच्या मोबदल्यात खाते, एटीएम कार्ड किंवा इंटरनेट बँकिंगची माहिती दुसऱ्याला दिल्याचे निष्पन्न झाल्यास संबंधित व्यक्तीलाही गुन्ह्यात आरोपी केले जाणार आहे. खाते जाणूनबुजून दिले होते का, त्याबदल्यात किती कमिशन मिळाले आणि खाते सायबर टोळीपर्यंत पोहोचविणारा मध्यस्थ कोण होता, याचा तपास पोलिस करीत आहेत.

पडद्यामागील एजंट पोलिसांच्या रडारवर

(Cyber Fraud) या कारवाईत सध्या केवळ खातेधारक कायद्याच्या कचाट्यात आले असले, तरी तपासाची खरी दिशा पडद्यामागील एजंट आणि मुख्य सूत्रधारांकडे आहे. संशयित खात्यांमध्ये पैसा पाठविणारे, तो तत्काळ काढणारे तसेच परदेशात किंवा अन्य खात्यांमध्ये वळविणारे लाभार्थी पोलिसांच्या रडारवर आहेत. बँक व्यवहारांची साखळी, मोबाइल क्रमांक, इंटरनेट बँकिंगचे आयपी पत्ते आणि डिजिटल संवादांची तांत्रिक तपासणी सुरू आहे.

क्षणिक कमिशनचा मोह ठरू शकतो तुरुंगवारीचे कारण

(Cyber Fraud) पोलिसांनी नागरिकांना आपले बँक खाते, एटीएम कार्ड, ओटीपी, सीमकार्ड किंवा नेट बँकिंगची माहिती कोणालाही देऊ नये, असे आवाहन केले आहे. क्षणिक कमिशनच्या मोहापायी खाते भाड्याने देणे म्हणजे सायबर गुन्हेगारांना मदत करण्यासारखे आहे. खाते तुमच्या नावावर असेल, तर त्यातून झालेल्या गुन्ह्याची चौकशीही प्रथम तुमच्यापासूनच सुरू होणार आहे.

हे ही वाचा : Water Cut  पुणेकरांना मोठा दिलासा! शहरात तूर्तास पाणीकपात नाही; खडकवासला धरणसाखळीत २०.१६ टीएमसी पाणीसाठा; सर्व भागांतील पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्याची महापौर मंजुषा नागपुरे यांची ग्वाही

Share on
Share on Facebook Share on Twitter Share on WhatsApp Share on WhatsApp
शिवराज सणस
View More Posts
शिवराज सणस हे पुणे-स्थित वरिष्ठ पत्रकार आहेत. पुण्यासह महाराष्ट्रातील राजकीय व सामाजिक घडामोडी हे त्यांच्या अभ्यासाचे विषय आहेत.
Previous Article Dighi Port Dighi Port कोकण-पश्चिम महाराष्ट्र आता आणखी जवळ; दिघी बंदर ते सुरूर १४० किमीचा नवा महामार्ग प्रस्तावित; पोलादपूरमार्गे उभारल्या जाणाऱ्या महामार्गामुळे अंतर ४५ किलोमीटरने घटणार; आंबेनळी-महाबळेश्वर घाटरस्त्याला पर्याय मिळण्याची शक्यता
Next Article Bond Service Bond Service एमबीबीएस डॉक्टरांची ‘बॉण्ड’ मधून सुटका; एक वर्षाची सक्तीची सेवा अखेर रद्द; पदव्युत्तर आणि अतिविशेषोपचार डॉक्टरांना मात्र बंधपत्र सेवा कायम; नियुक्तीच्या प्रतीक्षेत अडकलेल्या हजारो तरुण डॉक्टरांना दिलासा

Latest Posts

Purandar Airport
Purandar Airport पुरंदर विमानतळाला ‘टेकऑफ’; डिसेंबरपासून प्रत्यक्ष कामाचा श्रीगणेशा ! ७५ टक्के जमिनीचा ताबा प्रशासनाकडे; तीन महिन्यांत निविदा प्रक्रिया पूर्ण करण्याचे नियोजन, शेतकऱ्यांना ३,६०० कोटींचे वाटप
PMRDA
PMRDA पुण्याच्या विकासात ‘पीएमआरडीए’ नापास; प्राधिकरणाला टाळे ठोकण्याची मागणी; महानगर नियोजन समितीच्या सदस्यांचा गंभीर आरोप; चाकण-हिंजवडीतील वाहतूककोंडी, रखडलेला विकास आराखडा आणि अपुऱ्या पायाभूत सुविधांवरून कारभारावर प्रश्नचिन्ह
Bharat Gite
Bharat Gite उद्योगाला अध्यात्माची जोड; ‘ॲल्युमिनियम मॅन ऑफ इंडिया’ भरत गिते यांची भगवानगडाला भेट; महंत न्यायाचार्य नामदेव शास्त्री महाराजांशी शिक्षण, युवकांचे भविष्य आणि सामाजिक बांधिलकीवर चर्चा; श्री संत ज्ञानेश्वर माऊली मंदिराच्या कामाची घेतली माहिती
Music Therapy
Music Therapy संगीतातून आरोग्यसाधनेची नवी वाट; ‘सुर संजीवन’ पदविका अभ्यासक्रम १५ सप्टेंबरपासून; यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाची मान्यता; पुणे-मुंबईत ऑफलाइन, तर जगभरातील विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन शिक्षणाची सुविधा

You Might Also Enjoy

Pune Rural Police
क्राईम न्यूज

Pune Rural Police महाराष्ट्र-मध्य प्रदेशात घरफोड्यांचा धडाका; पुणे ग्रामीण पोलिसांच्या जाळ्यात सराईत चोरटा; १६ तोळे सोन्याचे दागिने आणि दुचाकीसह २४ लाख ३० हजारांचा मुद्देमाल जप्त; तीन गुन्ह्यांची उकल, आरोपीवर यापूर्वी १४ गुन्हे दाखल

Pune Rural Police शिक्रापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या एका घरफोडीच्या गुन्ह्याचा पोलीस तपास करत होते. घरातून सोन्याचे दागिने आणि इतर मौल्यवान वस्तू चोरीला गेल्याने आरोपीचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर होते. 

Posted by By शिवराज सणस September 7, 2026
Cancer Research
आरोग्य

Cancer Research कर्करोगावरील आयुर्वेद संशोधनाची जागतिक झेप; ‘अ‍ॅस्को ब्रेकथ्रू २०२६’साठी निवड; पुण्यातील रसायु कॅन्सर क्लिनिककडून ३,३५१ रुग्णांचा अभ्यास; जीवनमान सुधारण्यासाठी ५१ टक्के रुग्णांचा आयुर्वेदाकडे कल

Cancer Research रसायु कॅन्सर क्लिनिकचे संस्थापक वैद्य योगेश बेंडाळे यांच्या नेतृत्वाखाली हे संशोधन करण्यात आले. २०२० ते २०२५ या कालावधीत क्लिनिकमध्ये उपचारासाठी आलेल्या ३,३५१ कर्करोग रुग्णांच्या माहितीचा अभ्यासात समावेश करण्यात आला.

Posted by By शिवराज सणस August 20, 2026
Pune Municipal Corporation
महापालिकाराजकीय

Pune Municipal Corporation शिंदेवाडीत उभारणार १६० टीपीएच क्षमतेचे दोन अत्याधुनिक डांबरी प्लान्ट; दक्षिण पुण्यातील रस्त्यांच्या कामांना मिळणार गती; ८.९१ कोटींच्या प्रस्तावाला स्थायी समितीची मंजुरी, अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांची माहिती

Pune Municipal Corporation नवीन प्रकल्पामुळे कात्रज, गुजरवाडी, कोळेवाडी, उंड्री, बिबवेवाडी, कोंढवा-येवलेवाडी, धनकवडी, सिंहगड रस्ता आणि वारजे-कर्वेनगर परिसरात डांबरी मिश्रणाचा जलद पुरवठा करणे शक्य होणार आहे.

Posted by By शिवराज सणस August 20, 2026
Obscene Photos
क्राईम न्यूज

Obscene Photos ‘नकारात्मक ऊर्जा काढतो’ म्हणत तरुणीकडे अश्लील फोटोची मागणी; पुण्यातील स्वयंघोषित युट्यूबर ‘बाबा’ला अटक; मोटिव्हेशनल स्पीकर आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर म्हणून ओळख निर्माण; धमकावून फोटो घेतल्याचा आरोप, मोबाइल-लॅपटॉप जप्त

Obscene Photos सोशल मीडियावरील लोकप्रियता किंवा आध्यात्मिक दावे पाहून कोणत्याही व्यक्तीवर अंधविश्वास ठेवू नये, तसेच खासगी छायाचित्रांची मागणी झाल्यास तत्काळ पोलिस किंवा सायबर विभागाशी संपर्क साधावा

Posted by By शिवराज सणस August 19, 2026
© Copyright NewsFlashMarathi @ 2026

Our website uses cookies to improve your experience. Learn more about: Cookie Policy

Accept
Go to mobile version