Lohagad Fort
Lohagad Fort

Lohagad Fort लोहगडावरील ‘त्या’ अपघाती मृत्यूला धक्कादायक वळण! पाय घसरून पडल्याचा बनाव उघड; होणाऱ्या पत्नीनेच मित्राच्या मदतीने केतन अग्रवालचा केला खून ! जयपूरमधील राजेशाही थाटातील लग्नापूर्वीच थरारक शेवट

पुणे/लोणावळा :  पुणे आणि पिंपरी-चिंचवडच्या व्यावसायिक वर्तुळात प्रचंड खळबळ उडवून देणाऱ्या तरुण उद्योजक केतन अग्रवाल Ketan Agarwal मृत्यू प्रकरणाला आता एक अत्यंत धक्कादायक आणि थरारक वळण मिळाले आहे. लोणावळ्यातील ऐतिहासिक लोहगड किल्ल्यावर (Lohagad Fort) पाय घसरून दरीत पडल्याने केतन अग्रवालचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचा जो बनाव रचण्यात आला होता, त्याचा पर्दाफाश करण्यात पुणे ग्रामीण पोलिसांना यश आले आहे. हा कोणताही अपघात नसून एक पूर्वनियोजित कट रचून केलेली निर्घृण हत्या असल्याचे लोणावळा ग्रामीण पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे. 

धक्कादायक बाब म्हणजे, केतनच्या Ketan Agarwal होणाऱ्या पत्नीनेच आपल्या एका मित्राच्या मदतीने केतनला लोहगडाच्या (Lohagad Fort) कड्यावरून ४०० फूट खोल दरीत ढकलून दिले होते. या हाय-प्रोफाइल खून प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील कारवाई सुरू केली आहे.

(Lohagad Fort) लग्नासाठी दोन विमाने आणि आलिशान पॅलेस बुक, पण…

मृत केतन विशाल अग्रवाल Ketan Agarwal (वय २४, रा. लोढा बेलमोंडो, गहुंजे) हा पिंपरी-चिंचवडमधील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल यांचा मुलगा आणि कौटुंबिक रिअल इस्टेट फर्मचा संचालक होता. केतनचा विवाह पुणे मार्केटयार्डातील मसाल्यांचे मोठे आणि नामांकित व्यापारी गोयल यांची कन्या सिया गोयल हिच्याशी निश्चित झाला होता. दोन्ही मोठी व्यावसायिक कुटुंबे असल्याने हा विवाह सोहळा अत्यंत थाटामाटात पार पडणार होता.

 पुढील महिन्यात राजस्थानमधील जयपूर येथील एका भव्य आलिशान राजवाड्यात (पॅलेस) या शाही ‘बिग फॅट वेडिंग’चे आयोजन करण्यात आले होते. पाहुण्यांच्या सोयीसाठी दोन विशेष विमाने (चार्टर्ड फ्लाईट्स) देखील बुक करण्यात आली होती. संपूर्ण अग्रवाल कुटुंबात आनंदाचे वातावरण होते आणि लग्नाची पत्रिका वाटप सुरू होते. मात्र, या आनंदाच्या उंबरठ्यावर असतानाच हा भयानक प्रकार घडला.

१८ जूनचा तो थरारक ‘अपघाताचा’ बनाव

लग्नाच्या आधी भावी पत्नी सिया गोयल हिचा वाढदिवस (१९ जून) साजरा करण्यासाठी केतनने Ketan Agarwal खास सरप्राइज प्लॅनिंग केले होते. वाढदिवसाच्या आदल्या दिवशी म्हणजेच १८ जून रोजी सकाळी केतन सियासोबत लोणावळा येथील लोहगड किल्ल्यावर (Lohagad Fort) ट्रेकिंगसाठी गेला. पावसाळी हवामान असल्यामुळे गडावर दाट धुके आणि सोसाट्याचा वारा वाहत होता. किल्ल्यावरील एका धोकादायक कड्याच्या बाजूला उभे राहून फोटो काढत असताना अचानक पाय घसरून केतन ४०० फूट खोल दरीत कोसळला, अशी प्राथमिक माहिती सियाने दिली होती.

 केतन (Lohagad Fort) दरीत कोसळल्यानंतर सियाने आरडाओरडा करत हा एक दुर्दैवी अपघात असल्याचे भासवले. लोणावळा ग्रामीण पोलीस, शिवदुर्ग मित्र रेस्क्यू टीम आणि मावळ वन्यजीव रक्षक पथकाने सुमारे तीन तास शर्थीचे प्रयत्न करून केतनचा मृतदेह दरीतून बाहेर काढला होता. त्यावेळी पोलिसांनी अपघाती मृत्यूची (ADR) नोंद करून तपास सुरू केला होता.

…आणि मंगेतरच निघाली मुख्य सूत्रधार!

अपघाती मृत्यूची (Lohagad Fort) नोंद झाली असली, तरी लोणावळा ग्रामीण पोलिसांना घटनास्थळाची परिस्थिती आणि सियाच्या वर्तनावरून संशय आला होता. पोलीस निरीक्षक दिनेश तायडे आणि त्यांच्या पथकाने तांत्रिक विश्लेषण (Technical Analysis) सुरू केले. सियाचे मोबाईल कॉल डिटेल्स (CDR), लोकेशन आणि चॅट्स तपासले असता पोलिसांच्या हाती अत्यंत संशयास्पद माहिती लागली. पोलिसांनी सियाची कसून चौकशी केली आणि पोलिसी खाक्या दाखवताच तिने गुन्ह्याची कबुली दिली, ज्याने पोलीसही चक्रावून गेले.

(Lohagad Fort) तपासात उघड झाले की, सिया गोयल हिला केतन अग्रवालसोबत लग्न करायचे नव्हते. घरच्यांच्या दबावामुळे हा विवाह ठरला होता. केतनला आपल्या मार्गातून कायमचे हटवण्यासाठी तिने आपल्या एका खास मित्राच्या मदतीने हत्येचा कट रचला. ठरलेल्या योजनेनुसार, तिने केतनला लोहगड किल्ल्यावर ट्रेकिंगच्या बहाण्याने नेले. पावसाळ्यात पाय घसरून पडल्याचे दाखवून या हत्येला अपघाताचे रूप देणे सोपे जाईल, असा तिचा अंदाज होता. गडावरील एका निर्जन कड्यावर संधी साधताच सियाने तिच्या मित्राच्या मदतीने केतनला थेट दरीत ढकलून दिले. 

पुण्यात प्रचंड खळबळ

(Lohagad Fort) या हाय-प्रोफाइल ‘मर्डर मिस्ट्री’चा उलगडा झाल्याने पुणे, पिंपरी-चिंचवड आणि मावळ परिसरातील व्यावसायिक क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. ज्या घरात काही दिवसांनी लग्नाचे सनई-चौघडे वाजणार होते, तिथे आता केतनच्या निधनाने आणि या धक्कादायक खुलाशामुळे स्मशानशांतता पसरली आहे. लोणावळा ग्रामीण पोलिसांनी सिया गोयल आणि तिच्या साथीदाराविरुद्ध खुनाचा (कलम ३०२) गुन्हा दाखल केला असून पुढील तपास वेगाने सुरू आहे.

हे ही वाचा : Two Wheeler Parcel पुणेकरांना मोठा दिलासा! रेल्वेने दुचाकी पाठवणे आता आणखी स्वस्त; पॅकिंगची सक्ती अखेर रद्द! खाजगी कंत्राटदारांची लूट थांबली; प्रवाशांचे थेट ३४३ रुपये वाचणार, रेल्वे प्रशासनाचा मोठा निर्णय

शिवराज सणस हे पुणे-स्थित वरिष्ठ पत्रकार आहेत. पुण्यासह महाराष्ट्रातील राजकीय व सामाजिक घडामोडी हे त्यांच्या अभ्यासाचे विषय आहेत.