पुणे: पुण्यात नवीन वाहन खरेदी केल्यानंतर त्याला आपल्या आवडीचा, म्हणजेच ‘फॅन्सी’ किंवा ‘व्हीआयपी’ (VIP) नंबर लावण्याची क्रेझ पुणेकरांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळते. जर तुम्हीही नवीन दुचाकी घेण्याच्या तयारीत असाल आणि तुम्हाला तुमच्या वाहनासाठी खास नंबर (VIP Bike Number Pune) हवा असेल, तर तुमच्यासाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (RTO) दुचाकी वाहनांच्या नवीन नोंदणी मालिकेतील आकर्षक आणि पसंतीचे क्रमांक आरक्षित करण्यासाठी वाहनधारकांकडून आगाऊ अर्ज मागवले आहेत. या संदर्भात आरटीओने विशेष लिलाव प्रक्रिया जाहीर केली असून २ जुलै २०२६ पासून या प्रक्रियेला सुरुवात होणार आहे.
(VIP Bike Number Pune) लिलावाचे वेळापत्रक आणि फेऱ्या (Auction Schedule)आरटीओने दिलेल्या माहितीनुसार, पसंतीचे क्रमांक मिळवण्यासाठी दोन स्वतंत्र फेऱ्यांमध्ये अर्ज स्वीकारले जातील:
पहिली फेरी (First Round): (VIP Bike Number Pune) पहिल्या टप्प्यासाठीचे अर्ज गुरुवार, २ जुलै २०२६ रोजी सकाळी १०:३० ते दुपारी २:३० या वेळेत पुणे आरटीओ कार्यालयाच्या ‘खाजगी वाहन’ विभागात स्वीकारले जातील. जर एकाच क्रमांकासाठी एकापेक्षा जास्त अर्ज आले, तर त्या क्रमांकासाठी जाहीर लिलाव केला जाईल. या लिलावासाठीचे डिमांड ड्राफ्ट (डीडी) ३ जुलै रोजी दुपारी २:३० वाजेपर्यंत स्वीकारले जातील आणि त्याच दिवशी सायंकाळी ४:०० वाजता लिलाव प्रक्रिया पार पडेल.
दुसरी फेरी (Second Round): ३ जुलै रोजी प्राप्त झालेले अर्ज दुसऱ्या फेरीच्या लिलावासाठी विचारात घेतले जातील. या फेरीसाठी ६ जुलै रोजी दुपारी २:३० वाजेपर्यंत डिमांड ड्राफ्ट स्वीकारले जातील आणि ६ जुलै रोजी सायंकाळी ४:०० वाजता प्रत्यक्ष लिलाव सुरू होईल.
आवश्यक फी आणि कागदपत्रे (Fees & Documents)
महाराष्ट्र शासनाने ३० ऑगस्ट २०२४ रोजी लागू केलेल्या सुधारित शुल्क रचनेनुसार, पसंतीचा क्रमांक (VIP Bike Number Pune) आरक्षित करण्यासाठी वाहनधारकांना नियमित नोंदणी शुल्काच्या तिप्पट फी भरावी लागेल. अर्जासोबत खालील कागदपत्रे जोडणे बंधनकारक आहे:
१. विहित नमुन्यातील पूर्ण भरलेला अर्ज.
२. राष्ट्रीयीकृत किंवा शेड्युल्ड बँकेचा डिमांड ड्राफ्ट (DD).
३. पत्त्याचा पुरावा (Address Proof) – स्व-साक्षांकित प्रत.
४. ओळखपत्र (Identity Proof) – स्व-साक्षांकित प्रत.
५. पॅन कार्ड (PAN Card) – स्व-साक्षांकित प्रत.
डिमांड ड्राफ्ट (DD) संदर्भातील कडक नियम
(VIP Bike Number Pune) पसंतीचा क्रमांक मिळवण्यासाठी डिमांड ड्राफ्ट काढताना अर्जदारांनी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. आरटीओने याबाबत नियम अतिशय कडक केले आहेत:
डीडी हा पुणे येथील राष्ट्रीयीकृत किंवा शेड्युल्ड बँकेचाच असावा आणि तो दोन महिन्यांपेक्षा जुना नसावा.
हा डीडी “R.T.O., Pune” या अचूक नावाने काढलेला असावा.
प्रत्येक अर्जदार एका विशिष्ट नोंदणी क्रमांकासाठी केवळ एकच सीलबंद डीडी सादर करू शकतो.
एकाच क्रमांकासाठी एकापेक्षा जास्त डीडी जोडणे, डीडीची रक्कम चुकीची असणे किंवा इतर कोणत्याही नावाने डीडी काढल्यास तो अर्ज तात्काळ बाद (Reject) केला जाईल.
लिलावाची पद्धत आणि इतर अटी
जर (VIP Bike Number Pune) लिलावाच्या वेळी दोन किंवा अधिक बोलीदारांनी एकाच क्रमांकासाठी समान रक्कम सादर केली, तर चिठ्ठ्या टाकून (Draw of Lots) अंतिम क्रमांकाचे वाटप निश्चित केले जाईल. विशेष म्हणजे, लिलावाच्या वेळी अर्जदार स्वतः उपस्थित नसला तरीही लिलावाची प्रक्रिया ठरलेल्या वेळेत पूर्ण केली जाईल.
या प्रक्रियेत केवळ पुणे आरटीओच्या कार्यक्षेत्रात राहणारे वाहनधारकच अर्ज करण्यास पात्र आहेत. बाहेरीत पत्ता असलेले अर्ज, अपूर्ण माहिती असलेले अर्ज किंवा चुकीचा मोबाईल क्रमांक दिलेले अर्ज नाकारले जातील.
उर्वरित क्रमांकांसाठी ऑनलाईन सुविधेचा पर्याय
ऑफलाईन लिलाव प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण झाल्यानंतर, जे फॅन्सी किंवा व्हीआयपी क्रमांक शिल्लक राहतील, ते सर्व क्रमांक सरकारच्या अधिकृत ऑनलाईन वाहन पोर्टलवर उपलब्ध करून दिले जातील. वाहनधारक या अधिकृत डिजिटल पोर्टलवर जाऊन आपल्या आधार कार्डशी लिंक असलेल्या मोबाईल क्रमांकाचा वापर करून, थेट घरी बसून ओटीपी (OTP) पडताळणीद्वारे शिल्लक राहिलेले आवडीचे नंबर बुक करू शकतात. आरटीओच्या नियमांनुसार, एकदा आरक्षित केलेला क्रमांक वाहन नोंदणीसाठी १८० दिवसांपर्यंत (६ महिने) वैध राहील.
पुणेकरांमधील फॅन्सी नंबरची क्रेझ
पुण्यात फॅन्सी नंबरसाठी (VIP Bike Number Pune) लागणाऱ्या बोलींचे आकडे नेहमीच थक्क करणारे ठरतात. यापूर्वी झालेल्या लिलावात, केवळ ६,००0 रुपये मूळ किंमत असलेल्या ‘0007’ या क्रमांकासाठी एका पुणेकराने तब्बल ७,७७,७७७ रुपयांची बोली लावून तो मिळवला होता. तसेच, ‘१’ या अति-प्रतिष्ठित एक अंकी क्रमांकासाठी पुण्यात तब्बल १८ लाख रुपयांपर्यंतची बोली लागल्याचा ऐतिहासिक विक्रम नोंदवला गेला आहे. त्यामुळे जर तुम्हालाही तुमच्या नव्या दुचाकीला रॉयल लूक द्यायचा असेल, तर २ जुलै रोजी आरटीओ कार्यालयाला भेट देऊन या सुवर्णसंधीचा नक्की लाभ घ्या!