पुणे: पुण्याची आयटी हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वाघोली परिसरातून एक अत्यंत धक्कादायक, संतापजनक आणि माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. स्वतःला ईश्वराचा अवतार सांगणाऱ्या एका ढोंगी बाबाने आयटी कंपनीत कार्यरत असलेल्या एका ४१ वर्षीय उच्चशिक्षित महिला अधिकाऱ्यावर तब्बल १७ वर्षे अमानुष शारीरिक, लैंगिक आणि मानसिक अत्याचार केल्याचे उघड झाले आहे. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने आणि खराडी पोलिसांनी वाघोली येथील उबळेनगरमधील ‘माऊली सदन’ या बंगल्यावर मध्यरात्री थरारक छापा (Wagholi Ashram Raid) टाकून मुख्य ढोंगी बाबा राधा मोहन मिश्रा (वय ५९) याच्यासह त्याचा पुरुष साथीदार आणि सहा महिला अशा ८ जणांना अटक केली आहे. या भयानक घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात प्रचंड खळबळ उडाली आहे.
(Wagholi Ashram Raid) पीडित महिला पुण्यातील एका नामांकित आयटी कंपनीत ‘असोसिएट मॅनेजर’ म्हणून कार्यरत आहे, तर तिचे वडील पेशाने डॉक्टर आहेत. या प्रकरणाची सुरुवात २००९ मध्ये हरियाणात झाली.
पीडितेच्या डॉक्टर वडिलांची ओळख आधी स्वामी कमल नयन (वय ५८) नावाच्या व्यक्तीशी झाली. त्याच्या माध्यमातून त्यांचे कुटुंब हरियाणातील पंचकुला येथे कार्यरत असलेल्या ‘गुरुदेव साधना धाम ट्रस्ट’चा मुख्य संचालक राधा मोहन मिश्रा याच्या संपर्कात आले. मिश्राने स्वतःमध्ये अद्भूत दैवी शक्ती असल्याचे भासवून कुटुंबाचा पूर्ण विश्वास जिंकला. डॉक्टर वडिलांनी ढोंगी बाबाच्या ‘मॉडर्न गुरुकुल’च्या स्थापनेसाठी सुरुवातीला मोठा आर्थिक निधीही दिला. त्यानंतर २०१० मध्ये या बाबाने या कुटुंबाला पुण्यामध्ये स्थलांतरित होण्यास भाग पाडले.
(Wagholi Ashram Raid) श्रद्धेच्या नावाखाली १७ वर्षे छळ आणि नरकयातना
मिश्राने पीडितेच्या मनात देवाचे भय आणि अंधश्रद्धा निर्माण केली होती. ‘तुझ्या भक्तीची आणि आज्ञाधारकतेची परीक्षा’ घेण्याच्या बहाण्याने त्याने २००९ ते २०२६ या प्रदीर्घ कालावधीत पीडितेवर वारंवार बलात्कार केला. पीडितेने दिलेल्या फिर्यादीनुसार, अत्याचार करताना क्रूरतेच्या सर्व मर्यादा ओलांडल्या गेल्या. तिला सातत्याने बेदम मारहाण करणे, जबरदस्तीने स्वतःचे मूत्र पिण्यास भाग पाडणे, आणि तिची सहनशक्ती तपासण्याच्या नावाखाली तिला थेट विजेचे (इलेक्ट्रिक) झटके देणे अशा अत्यंत अघोरी आणि अमानुष छळाला तिला सामोरे जावे लागले.
(Wagholi Ashram Raid) या नराधमाने पीडितेचे अश्लील व्हिडिओ देखील चित्रित केले आणि त्याद्वारे तिला सातत्याने ब्लॅकमेल केले