पुणे : पुण्यातील एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी MIT World Peace University येथे हनुमान जन्मोत्सवानिमित्त आयोजित कुस्ती स्पर्धेत सुमारे १०० हून अधिक पैलवानांनी सहभाग घेतला. पारंपरिक मल्लविद्येला चालना देण्याच्या उद्देशाने आयोजित या स्पर्धेत खुल्या गटात पै. निखिल वाडेकर याने विजेतेपद पटकावले.
MIT World Peace University “मऊ मेणाहूनि आम्ही, विष्णूदास कठीण वज्रास भेदू असे” अशी परंपरा असलेल्या एमआयटीत जागतिक दर्जाचे पैलवान घडत असल्याचे मत संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड यांनी व्यक्त केले.
बल आणि बुद्धीचा संगम असलेल्या मल्लविद्येला नवसंजीवनी देण्यासाठी विद्यापीठात MIT World Peace University सातत्याने कुस्ती स्पर्धांचे आयोजन केले जात असल्याचे त्यांनी Dr. Vishwanath Karad सांगितले.
उद्घाटनाची सलामी लढत रंगली
स्पर्धेच्या उद्घाटनावेळी Wrestling Competition Pune खुल्या वजनी गटातील पहिली लढत एमआयटी तालमीच्या पै. अनुदान चव्हाण आणि हिंदकेसरी आखाड्याच्या पै. अक्षय उघाडे यांच्यात झाली. अत्यंत चुरशीच्या या सामन्यात पै. अनुदान चव्हाण याने विजय मिळवत दमदार सुरुवात केली.
अंतिम सामन्यात वाडेकरचा दबदबा
स्पर्धेतील अंतिम लढत Wrestling Competition Pune एमआयटीच्या पै. निखिल वाडेकर आणि खडकवासला तालमीच्या वैष्णव मारणे यांच्यात झाली. अटीतटीच्या या सामन्यात निखिल वाडेकरने उत्कृष्ट तंत्र आणि ताकदीच्या जोरावर विजय मिळवला. त्याच्या खेळीने प्रेक्षकांची वाहवा मिळवली.
मान्यवरांची उपस्थिती आणि महापूज
कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रा. डॉ. विश्वनाथ कराड Dr. Vishwanath Karad यांच्या हस्ते विद्यापीठ MIT World Peace University परिसरातील हनुमान मंदिरात महापूजा करण्यात आली. त्यानंतर स्पर्धेचे उद्घाटन झाले. यावेळी डॉ. राहुल विश्वनाथ कराड, डॉ. आदिती कराड, डॉ. आर. एम. चिटणीस, प्रा. स्वाती कराड-चाटे यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
कुस्तीमुळे शक्ती आणि रणनीतीचा विकास
कुस्ती हा केवळ ताकदीचा नव्हे तर बुद्धिमत्तेचा खेळ असल्याचे प्रा. डॉ. विश्वनाथ कराड Dr. Vishwanath Karad यांनी नमूद केले. विद्यार्थ्यांनी व्यायामासोबत अभ्यासावरही भर देत सर्वांगीण विकास साधावा, असे त्यांनी आवाहन केले. तर डॉ. राहुल कराड Rahul Karad यांनी कुस्तीमुळे मन आणि मनगट मजबूत होत असल्याचे सांगितले.
बाल कुस्तीपटूंचा उत्स्फूर्त सहभाग
या स्पर्धेचे Wrestling Competition Pune विशेष आकर्षण म्हणजे बाल कुस्तीपटूंचा मोठ्या संख्येने सहभाग होता. लहान वयातच कुस्तीबद्दलची आवड आणि कौशल्य पाहून उपस्थितांनी कौतुक केले. यामुळे मल्लविद्येचे भवितव्य उज्ज्वल असल्याचे चित्र दिसून आले.
रोख पारितोषिके आणि सन्मान
स्पर्धेतील Wrestling Competition Pune विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते रोख पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. सहभागी पैलवानांच्या उत्कृष्ट कामगिरीचे कौतुक करण्यात आले.
समालोचन आणि आयोजनाची माहिती
प्रा. विलास कथुरे यांनी प्रस्तावनेत एमआयटीत MIT World Peace University आयोजित केल्या जाणाऱ्या कुस्ती स्पर्धांची माहिती दिली. देशातील नामांकित पैलवानांनी येथे भेट दिल्याचा उल्लेख त्यांनी केला. कुस्तीचे धावते समालोचन बाबा निम्हण यांनी केले, तर सूत्रसंचालनाची जबाबदारी प्रा. विलास कथुरे यांनी सांभाळली.

















