लोणी काळभोर पुणे : वैद्यकीय क्षेत्रातील प्रगत तंत्रज्ञान आणि डॉक्टरांच्या अद्भूत कौशल्याचा एक अनोखा चमत्कार पुणे जिल्ह्यातील लोणी काळभोर येथील माईर्सच्या विश्वराज हॉस्पिटलमध्ये पाहायला मिळाला आहे. कोणत्याही प्रकारची पारंपरिक शस्त्रक्रिया न करता, छातीला एकही मोठा चीरा न देता आणि रुग्णाला पूर्णपणे बेशुद्ध न करता एका ७५ वर्षीय वृद्धाच्या हृदयाची झडप यशस्वीरित्या पूर्ववत करण्यात आली आहे. अत्यंत प्रगत अशा ‘ट्रान्सकॅथेटर एओर्टिक व्हॉल्व्ह रिप्लेसमेंट’ (TAVR procedure in Pune) प्रक्रियेद्वारे या रुग्णाला नवीन आयुष्य देण्यात डॉक्टरांना यश आले आहे.
विशेष बाब म्हणजे, सुमारे दीड तास चाललेल्या या अत्याधुनिक प्रक्रियेदरम्यान (TAVR procedure in Pune) ७५ वर्षीय वृद्ध रुग्ण पूर्णपणे शुद्धीत होते आणि कॅथ लॅबमधील वैद्यकीय टीमसोबत आनंदाने संवादही साधत होते.
विश्वराज हॉस्पिटलचे प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉ. सूरज इंगोले यांनी पत्रकार परिषदेत या यशस्वी उपचाराची सविस्तर माहिती दिली. याप्रसंगी हॉस्पिटलचे व्यवस्थापकीय संचालक (MD) डॉ. सुजीथ कुमार आणि ऑपरेशन्स विभागाचे प्रमुख (HOD) डॉ. संतोष साहू उपस्थित होते.
रुग्णाचा अत्यंत गुंतागुंतीचा वैद्यकीय इतिहास
(TAVR procedure in Pune) उपचार करण्यात आलेले ७५ वर्षीय रुग्ण हे हृदयविकाराच्या अत्यंत क्लिष्ट आणि गंभीर समस्येने त्रस्त होते. १५ वर्षांपूर्वी त्यांच्यावर ‘कोरोनरी आर्टरी बायपास’ (CABG) ही मोठी शस्त्रक्रिया झाली होती. त्यानंतर अवघ्या दोन वर्षांपूर्वी त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्यामुळे त्यांची तातडीने ‘एन्जीओप्लास्टी’ देखील करण्यात आली होती.
या दोन्ही प्रक्रियांनंतर त्यांना ‘एओर्टिक व्हॉल्व्ह स्टेनोसिस’ म्हणजेच हृदयाची मुख्य झडप अरुंद होण्याचा गंभीर आजार असल्याचे निदान झाले. यामुळे त्यांना वारंवार चक्कर येणे आणि श्वास घेण्यास प्रचंड त्रास होत होता. वाढते वय आणि यापूर्वी झालेल्या दोन मोठ्या हृदय शस्त्रक्रिया लक्षात घेता, पुन्हा एकदा पारंपरिक ‘ओपन हार्ट’ शस्त्रक्रिया करणे अत्यंत अत्यंत धोक्याचे आणि जीवघेणे ठरू शकले असते.
शस्त्रक्रियाविरहित ‘टीएव्हीआर’ ठरली संजीवनी!
पारंपरिक शस्त्रक्रियेमधील मोठा धोका लक्षात घेऊन विश्वराज हॉस्पिटलच्या हृदयरोग तज्ज्ञांच्या टीमने रुग्णासाठी सर्वात सुरक्षित आणि आधुनिक पर्याय निवडला, तो म्हणजे ‘टीएव्हीआर’ ((TAVR procedure in Pune). ही एक ‘मिनिमली इनव्हेसिव्ह’ (कमीत कमी छेद घेणारी) आणि पूर्णपणे शस्त्रक्रियाविरहित प्रगत पद्धती आहे.
या प्रक्रियेविषयी माहिती देताना डॉ. सूरज इंगोले यांनी सांगितले, (TAVR procedure in Pune) “या आधुनिक तंत्रज्ञानात रुग्णाच्या मांडीतील मुख्य रक्तवाहिनीतून सुईच्या साहाय्याने एक अत्यंत छोटे छिद्र केले जाते. तिथून एका विशेष वायर आणि कॅथेटरच्या मदतीने नवीन कृत्रिम व्हॉल्व्ह (झडप) थेट हृदयापर्यंत पोहोचवला जातो. हा नवीन व्हॉल्व्ह खराब झालेल्या जुन्या झडपेच्या ठिकाणी अत्यंत अचूकपणे बसवला जातो. यामध्ये छातीवर कोणताही मोठा चीरा मारण्याची किंवा छाती उघडण्याची अजिबात गरज पडत नाही.”
दुसऱ्याच दिवशी रुग्ण लागला चालायला!
हॉस्पिटलचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. सुजीथ कुमार यांनी या प्रक्रियेनंतरच्या जलद रिकव्हरीबाबत माहिती दिली. ते म्हणाले, “पारंपरिक ओपन हार्ट शस्त्रक्रियेमध्ये रुग्णाला बरे होण्यासाठी आणि सामान्य जीवनात परतण्यासाठी दीर्घकाळ वाट पाहावी लागते. मात्र, टीएव्हीआर पद्धतीमुळे (TAVR procedure in Pune) या रुग्णाला प्रक्रियेच्या आदल्या दिवशी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. प्रक्रियेनंतर दुसऱ्याच दिवशी ते स्वतःच्या पायावर चालू लागले आणि चौथ्या दिवशी त्यांना सुरक्षितपणे घरी सोडण्यात आले. एका महिन्यानंतर घेतलेल्या फॉलो-अपमध्ये रुग्ण अत्यंत निरोगी असून त्यांना श्वास घेण्याचा किंवा कोणताही इतर त्रास जाणवत नाही.”
“डॉक्टरांनी मला जीवनदान दिले!” – रुग्णाची कृतज्ञता
हृदयाच्या गंभीर त्रासामुळे चिंताग्रस्त झालेल्या रुग्णाने आपला अनुभव सांगताना सांगितले, “आम्ही खूप घाबरलो होतो आणि सुरक्षित उपचाराचा शोध घेत होतो. त्यानंतर आम्ही विश्वराज हॉस्पिटलमधील डॉ. सूरज इंगोले यांची भेट घेतली. त्यांनी आम्हाला ‘टीएव्हीआर’ तंत्रज्ञानाची माहिती देऊन ही प्रक्रिया पूर्णपणे सुरक्षित असल्याचा विश्वास दिला. येथील डॉक्टर्स, परिचारिका आणि इतर कर्मचाऱ्यांनी मला जी आपुलकीची आणि तत्पर सेवा दिली, त्यामुळे माझा आत्मविश्वास वाढला.”
विश्वराज हॉस्पिटलचे प्रगत वैद्यकीय पाऊल
विश्वराज हॉस्पिटलच्या कार्यकारी संचालिका डॉ. अदिती राहुल कराड यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली हे रुग्णालय सातत्या प्रगत रुग्णसेवा देत आहे. लोणी काळभोर येथील हे ३०० हून अधिक बेडचे सुपर स्पेशालिटी टर्शियरी केअर रुग्णालय आहे. हृदयरोगशास्त्र (Cardiology), हृदय शस्त्रक्रिया (Cardiac Surgery) आणि इतर सर्व वैद्यकीय शाखांमध्ये प्रगत व आंतरराष्ट्रीय दर्जाच्या आरोग्य सुविधा पुरवण्यासाठी हे रुग्णालय ओळखले जाते.
या यशस्वी वैद्यकीय टीमचे योगदान
(TAVR procedure in Pune) ही अत्यंत गुंतागुंतीची आणि यशस्वी प्रक्रिया हृदयरोग तज्ज्ञ डॉ. सूरज इंगोले यांनी यशस्वीपणे पार पाडली. त्यांना भूलतज्ज्ञ डॉ. क्षितिज गायकवाड आणि डॉ. दीपक कवडे यांचे मोलाचे सहकार्य लाभले. तसेच सहाय्यक डॉक्टर डॉ. विष्णू व डॉ. अनघा, कॅथ लॅब तंत्रज्ञ मनोज आणि कल्याण, आणि स्टाफ नर्स अमित व मीना यांनी या कामगिरीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली.
पुणे आणि ग्रामीण परिसरातील रुग्णांसाठी ‘टीएव्हीआर’ सारखी प्रगत आणि सुरक्षित उपचार पद्धती आता जवळच उपलब्ध झाल्याने हृदयविकाराच्या गंभीर रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे.