PMC JE Recruitment Exam Cancelled विविध निवडणुकांमुळे पुणे महापालिकेच्या PMC कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) पदाची भरती प्रक्रिया एक वर्षापासून पुढे ढकलली जात होती. यासाठी रविवारी २५ जानेवारीचा मुहूर्त ठरला होता पण ऑनलाइन होणारी ही परीक्षा रद्द करण्यात आल्याची माहिती महापालिका प्रशासनातर्फे देण्यात आली आहे.
पुणे महापालिकेत PMC विविध श्रेणींच्या हजारो जागा रिक्त असूनही त्यासाठीची भरती प्रक्रिया राबविण्याकडे प्रशासन दुर्लक्ष करत आहे. अभियंता श्रेणीतील रिक्त जागांची संख्याही मोठी असून, त्या भरल्या जात नव्हत्या.
रिक्त जागांमुळे कामकाजावर परिणाम होत होता. भरतीवरील बंदी उठल्यानंतर प्रक्रिया सुरू झाली होती . महापालिकेने २०२२-२३ मध्ये विविध पदांसाठी ७४८ जागांची भरती केली होती. मार्च २०२४ मध्ये कनिष्ठ अभियंता पदाच्या ११३ जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली.
त्यावेळी लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता, मराठा आरक्षणाचा समावेश व शासनाची मंजुरी, संपुष्टात आलेला ‘आयबीपीएस’ बरोबरचा करार, अशा कारणांमध्ये भरती प्रक्रिया अडकली. ‘आयबीपीएस’बरोबर नव्याने करार झाल्यानंतर उमेदवारांना अर्जात बदल करण्याची मुभा देण्यात आली.
लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या अडथळ्यांनंतर कनिष्ठ अभियंता JE पदासाठीच्या भरती प्रक्रियेचे नियोजन महापालिकेने PMC केले होते. त्यानुसार एक डिसेंबरला परीक्षा होणार होती.
मात्र, पुन्हा नगरपालिका, नगरपंचायतीच्या निवडणुकांचा अडथळा आल्याने महापालिकेने परीक्षा पुढे ढकलली होती. १५ डिसेंबरला परीक्षा घेण्याचे महापालिकेने निश्चित केले होते.
मात्र, त्यावेळी महापालिका PMC निवडणुकीची आचारसंहिता जाहीर झाली. आता २५ जानेवारी रोजी घेण्यात येणारी परीक्षाही पुढे ढकलण्यात आली आहे.
Leave a Reply