पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यातील शर्तभंग झालेल्या २२० प्रकरणांची माहिती Pune land violation cases जिल्हा प्रशासनाकडे उपलब्ध झाली असून, एप्रिल महिनाअखेरपर्यंत या जमिनी ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत.
Pune land violation cases पुणे आणि पिंपरी-चिंचवडसह संपूर्ण जिल्ह्यात सरकारकडून भाडेतत्त्वावर किंवा कब्जेहक्काने देण्यात आलेल्या वर्ग दोनच्या जमिनींची तपासणी करण्यात आली. यात वतन, आदिवासी आणि देवस्थानांसाठी दिलेल्या जमिनींचा समावेश आहे. या तपासणीत एकूण ३५३ प्रकरणांमध्ये शर्तभंग झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
गैरव्यवहाराच्या पार्श्वभूमीवर हालचाली
मुंढवा आणि ताथवडे येथील शासकीय जमीन गैरव्यवहार प्रकरणानंतर प्रशासन अधिक सतर्क झाले आहे. या पार्श्वभूमीवर Pune land violation cases शर्तभंग करणाऱ्या देवस्थानांना नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी तहसीलदार आणि उपविभागीय अधिकाऱ्यांची बैठक घेऊन कारवाईला गती दिली.
२१०० प्रकरणांची तपासणी
जिल्ह्यातील सुमारे २१०० प्रकरणांमध्ये Pune land violation cases सरकारी जमिनी भाडेतत्त्वावर देण्यात आल्या आहेत. या जमिनींचा मूळ उद्देशानुसार वापर होतो का, याची सविस्तर शहानिशा करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार तहसीलदारांकडून अहवाल मागविण्यात आले आणि संबंधित भाडेपट्टेधारकांना नोटिसा देण्यात आल्या.
शर्तभंगाची प्रमुख कारणे
तपासणीत अनेक गंभीर बाबी समोर आल्या आहेत. निवासी वापरासाठी दिलेल्या जमिनींचा व्यावसायिक वापर, जमिनी भाड्याने देऊन उत्पन्न मिळविणे, मूळ लाभार्थ्यांऐवजी इतरांचा समावेश करणे, तसेच ठरावीक कालावधीत जमीन न वापरणे ही शर्तभंगाची Pune land violation cases प्रमुख कारणे असल्याचे निदर्शनास आले आहे.
मुदत संपल्याने प्रशासनाचा बडगा
शर्तभंग प्रकरणांमध्ये दंड भरून जमीन नियमित करण्यासाठी दिलेली मुदत आता संपुष्टात आली आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने या प्रकरणांची गंभीर दखल घेत कारवाई सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
२२० प्रकरणांवर तातडीची कारवाई
३५३ प्रकरणांपैकी २२० प्रकरणांची सविस्तर माहिती प्रशासनाकडे उपलब्ध झाली आहे. या प्रकरणांची तपासणी करून एप्रिल महिन्याच्या अखेरीस संबंधित जमिनी ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे.
प्रशासनाचा इशारा
जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी स्पष्ट केले की, सरकारी जमिनींचा गैरवापर सहन केला जाणार नाही. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल. या कारवाईमुळे भविष्यात शासकीय जमिनींचा योग्य वापर सुनिश्चित होईल, असा प्रशासनाचा विश्वास आहे.