पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकारण तापताना दिसत आहे. भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यातील जागावाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. शिवसेनेकडून जितक्या जागांची मागणी होत आहे, तितक्या जागा देण्यास भाजप तयार नसल्यामुळे चर्चा अजूनही निष्कर्षाविना सुरू आहेत. त्यामुळे पुणे महापालिकेसाठी सुरू असलेली जागावाटपातील रस्सीखेच आता निर्णायक टप्प्यावर आली आहे.
या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (शिंदे गट) नेते रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) वेगळा आणि मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चांना जोर आला आहे. काही दिवसांपूर्वी पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊसच्या जमिनीवरून मोठा वाद निर्माण झाला होता.
या प्रकरणात रवींद्र धंगेकर यांनी आक्रमक भूमिका घेत भाजप खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर गंभीर आरोप केले होते. जैन बोर्डिंगची जागा बळकावल्याचा आरोप केल्यानंतर राजकीय वातावरण तापले होते. अखेर हा संबंधित व्यवहार रद्द करण्यात आला.
मात्र, आता आगामी पुणे महापालिका निवडणुकीत भाजपकडून रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांची कोंडी केली जात असल्याच्या चर्चा दबक्या आवाजात सुरू आहेत. या कथित कोंडीमुळे धंगेकर मोठा निर्णय घेऊ शकतात, अशी शक्यता वर्तवली जात आहे. त्यांचा मुलगा प्रणव धंगेकर अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे. प्रभाग क्रमांक २४ मधून प्रणव धंगेकर अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात उतरण्याची शक्यता आहे.
Ravindra Dhangekar: तर निवडणुका कोणासाठी लढवायच्या?
दरम्यान, जागावाटपावरून रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. भाजपकडून आम्हाला निवडून न येणाऱ्या जागा देण्यात येत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. त्यामुळे महायुतीतील अंतर्गत मतभेद आता उघडपणे समोर येताना दिसत आहेत.
या संदर्भात बोलताना रवींद्र धंगेकर म्हणाले, “शहरात जर कार्यकर्त्यांना न्याय मिळत नसेल, तर निवडणुका कोणासाठी लढवायच्या हा मोठा प्रश्न आहे. भाजपने शिवसेनेला जो प्रस्ताव दिला आहे, तो आम्हाला मान्य नाही. ज्या जागा आम्हाला ऑफर करण्यात आल्या आहेत, त्या जागांवर कधी भाजप निवडून आलेली नाही किंवा शिवसेनाही जिंकलेली नाही. अशा जागा घेऊन आम्ही काय करायचे?”
हेही वाचाः PMC BJP Candidate List: आमदार-खासदारांच्या नातेवाईकांना उमेदवारी नाही
Leave a Reply