Yashwantrao Chavan award Pune पुण्यात ४० वे कवी संमेलन आणि यशवंतराव चव्हाण कला-साहित्य पुरस्कार सोहळा; अभिनेते महेश कोठारे यांना ‘कला जीवनगौरव’, रानमाणूस प्रसाद गावडे यांना ‘अजितदादा सामाजिक कार्य पुरस्कार’

Prakash Dhere Trust

पुणे : Yashwantrao Chavan award Pune महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री Yashwantrao Chavan यांच्या जयंतीनिमित्त स्वर्गीय प्रकाश ढेरे चॅरिटेबल ट्रस्ट आणि गंगा लॉज मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने ४० वे कवी संमेलन व ‘यशवंतराव चव्हाण कला-साहित्य पुरस्कार’ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा सोहळा गुरुवारी (१२ मार्च) रात्री ८.३० वाजता पुण्यातील Tilak Smarak Mandir येथे होणार आहे.

Yashwantrao Chavan award Pune यंदा या पुरस्कार सोहळ्याचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे चार दशकांची परंपरा पूर्ण करत ४० व्या वर्षात पदार्पण होत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून हा कार्यक्रम राज्यातील साहित्य, कला आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांना सन्मानित करण्यासाठी आणि काव्यसंस्कृतीला व्यासपीठ देण्यासाठी आयोजित केला जातो.

या वर्षी ज्येष्ठ अभिनेते आणि दिग्दर्शक Mahesh Kothare यांना ‘यशवंतराव चव्हाण कला जीवनगौरव पुरस्कार’ Yashwantrao Chavan award Pune जाहीर करण्यात आला आहे. मराठी चित्रपटसृष्टीत दीर्घकाळ उल्लेखनीय कामगिरी करत प्रेक्षकांच्या मनात वेगळे स्थान निर्माण करणाऱ्या कोठारे यांना या पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे.

तसेच राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री Ajit Pawar यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ प्रथमच दिला जाणारा ‘अजितदादा सामाजिक कार्य पुरस्कार’ सावंतवाडी येथील सामाजिक कार्यकर्ते रानमाणूस प्रसाद गावडे यांना जाहीर करण्यात आला आहे. ग्रामीण आणि आदिवासी भागात सामाजिक उपक्रम राबवून समाजसेवेचे कार्य केल्याबद्दल त्यांना हा सन्मान दिला जाणार आहे.

या दोन्ही पुरस्कारांचे वितरण राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष Sunil Tatkare यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. कार्यक्रमाला ज्येष्ठ नाट्यअभिनेते आणि साहित्यिक Satish Alekar तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष सुनील टिंगरे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. या पुरस्काराचे स्वरूप ५० हजार रुपये रोख रक्कम आणि सन्मानचिन्ह असे आहे.

याच कार्यक्रमात ‘यशवंतराव चव्हाण साहित्य पुरस्कार’ Yashwantrao Chavan award Pune देखील प्रदान करण्यात येणार आहेत. यंदा हा सन्मान तीन साहित्यिकांना जाहीर करण्यात आला आहे. बुलढाणा येथील प्रेषित प्रदीप सिद्धभट्टी यांच्या ‘विस्मरणाच्या आरण्यात’ या काव्यसंग्रहाला, चंद्रपूर येथील अविनाश पोईनकर यांच्या ‘दंडकारूण्य’ या साहित्यकृतीला आणि नाशिक येथील प्रतिभा पवार-खैरनार यांच्या ‘वंशावळीच्या प्राचीन सरीतून’ या कवितासंग्रहाला हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. या पुरस्काराचे स्वरूप ११,००१ रुपये रोख व सन्मानचिन्ह असे आहे.

सोहळ्याच्या निमित्ताने आयोजित करण्यात येणारे कवी संमेलन हे या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण असणार आहे. राज्यभरातील अनेक नामवंत कवी यामध्ये सहभागी होणार आहेत. यामध्ये अशोक नायगावकर (मुंबई), महेश केळुसकर (फोंडा), वैशाली पतंगे (कुंभारगाव), यामिनी दळवी (मुंबई), प्रशांत मोरे (कल्याण), कल्पना दुधाळ (बोरी भडक), मधुरा उमरीकर (परभणी), अविनाश कोठावडे (संभाजीनगर), अरुण पवार (परळी वैजनाथ), भरत दौंडकर (निमगाव म्हाळुंगी), अंजली कुलकर्णी (पुणे), अनिल दीक्षित (पिंपरी-चिंचवड), शशिकांत तिरोडकर (कोकण) आणि गुंजन पाटील (सोयगाव) यांचा समावेश आहे.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्येष्ठ साहित्यिक रामदास फुटाणे करणार असून कवी संमेलनात विविध कवी आपल्या रचना सादर करणार आहेत. त्यामुळे साहित्यप्रेमींना समृद्ध काव्यरसिकतेचा आनंद मिळणार आहे.

या संदर्भात पत्रकार परिषदेत माहिती देताना संयोजक संजय ढेरे यांनी सांगितले की, गेल्या ४० वर्षांपासून १२ मार्च रोजी सातत्याने हा सोहळा आयोजित करण्याची परंपरा कायम ठेवली आहे. महाराष्ट्रातील साहित्य, कला आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांना गौरवण्याचा आणि नवोदितांना प्रेरणा देण्याचा या उपक्रमामागील उद्देश आहे.

प्रकाश ढेरे चॅरिटेबल ट्रस्ट आणि गंगा लॉज मित्र मंडळ यांचा हा उपक्रम राज्यातील साहित्य-कला क्षेत्रातील एक महत्त्वाचा सांस्कृतिक सोहळा ठरला असून यंदाचा ४० वा सोहळा अधिक भव्य आणि संस्मरणीय करण्याचा ट्रस्टचा संकल्प असल्याचे आयोजकांनी सांगितले.

हे ही वाचा : Pune Municipal Corporation एप्रिलनंतर कमी दराच्या निविदांना लगाम; महापालिकेचे नवे धोरण; पूर्वगणनपत्रकापेक्षा ३०–५० टक्के कमी दराच्या निविदांना मंजुरी नाही

Exit mobile version