पुणे :Rahul Karad MIT WPU उच्च शिक्षण क्षेत्रात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर लक्ष केंद्रित करणाऱ्या देशातील पहिल्या ‘लाईफ ट्रान्सफॉर्मेशन सेंटर’ (एलटीसी) Life Transformation Center चे उद्घाटन गुरुवारी, १२ मार्च रोजी दुपारी ४ वाजता पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील बोरीबेल येथे होणार आहे. ‘व्यक्तीचा आत्मा आणि माती यांचा संबंध जोडणे’ या अनोख्या संकल्पनेवर आधारित हे केंद्र उभारण्यात आले असून, विद्यार्थ्यांच्या शारीरिक, बौद्धिक आणि मानसिक विकासासाठी हा शिक्षण क्षेत्रातील महत्त्वपूर्ण आणि मैलाचा दगड ठरणारा प्रयोग असल्याची माहिती एलटीसीचे संकल्पक आणि एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे डॉ. राहुल कराड यांनी पत्रकार परिषदेत दिली.
Rahul Karad MIT WPU या केंद्राची उभारणी स्वर्गीय उर्मिला वि. कराड यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ करण्यात आली आहे. उद्घाटन समारंभाला मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष विश्वधर्मी प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड असतील.
उद्घाटन सोहळ्यास पतंजली योगपीठाचे संस्थापक आणि आध्यात्मिक गुरु स्वामी रामदेव बाबा तसेच महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार या विशेष सन्माननीय पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहेत. याशिवाय दक्षिण कमांडचे जनरल ऑफिसर कमांडिंग इन चीफ ले. जनरल धिरज सेठ (पीव्हीएसएम, एव्हीएसएम) आणि राजीव गांधी खेल रत्न पुरस्कार विजेते नेमबाज रंजन सोधी हेही कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत.
यावेळी आमदार श्रीकांत भारतीय, आमदार अॅड. राहुल कुल, लातूर ग्रामीणचे आमदार रमेश कराड, सरपंच नंदकिशोर पाचपुते, महाराष्ट्र स्टेट ग्रामपंचायत ऑफिसर्स युनियनचे अध्यक्ष संजीव निकम तसेच पद्मश्री पोपटराव पवार यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
पाच स्तंभावर आधारित संकल्पना
लाईफ ट्रान्सफॉर्मेशन सेंटरची संकल्पना पाच प्रमुख स्तंभावर आधारित आहे. त्यामध्ये
कृषी आणि निसर्ग (Agriculture and Nature)
शारीरिक स्वास्थ्य आणि खेळ (Physical Fitness and Sports)
संघनिर्मिती आणि नेतृत्व (Team Building and Leadership)
देशभक्ती आणि राष्ट्रनिर्माण (Patriotism and Nation Building)
अध्यात्म आणि शांती (Spirituality and Peace)
या पाच घटकांवर आधारित प्रशिक्षणाद्वारे विद्यार्थ्यांचा शारीरिक, बौद्धिक आणि मानसिक विकास साधण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. त्याचबरोबर जीवनाकडे संतुलित आणि सकारात्मक दृष्टिकोनातून पाहण्याची क्षमता विद्यार्थ्यांमध्ये विकसित करण्याचे उद्दिष्ट आहे.
१५० एकर परिसरात उभारलेले केंद्र
डॉ. राहुल कराड Rahul Karad MIT WPU यांनी पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील बोरीबेल येथे सुमारे १५० एकरांहून अधिक परिसरात हे केंद्र Life Transformation Center उभारले आहे. येथे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाबरोबरच आत्मशोधासाठी मदत करणारी विशेष परिसंस्था तयार करण्यात आली आहे. ‘आत्म्याचा मातीशी संबंध जोडणे’ या मूलभूत तत्त्वावर आधारित हा प्रकल्प राबविण्यात आला आहे.
अनुभवाधारित शिक्षणावर भर
या केंद्राचे Life Transformation Center सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे येथे दिले जाणारे प्रशिक्षण अनुभवाधारित (Experiential Learning) असणार आहे. जीवनातील प्रत्यक्ष समस्या आणि आव्हानांवर आधारित शिक्षणपद्धती येथे वापरण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना पर्यावरणपूरक जीवनशैली, समाजाभिमुख विचार आणि जबाबदार नागरिकत्व यांचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.
डिजिटल युगातील ताणतणावावर उपाय
आजच्या डिजिटल युगात मोबाईल, सोशल मीडिया आणि स्पर्धात्मक जीवनशैलीमुळे तरुणांमध्ये ताणतणाव वाढत आहे. यावर उपाय म्हणून एलटीसीमध्ये ‘किमानता’ (Minimalism) या संकल्पनेवर विशेष भर दिला जाणार आहे. साधी राहणी, अनावश्यक गोष्टींचा त्याग आणि जीवनातील आवश्यक गोष्टींवर लक्ष केंद्रित करण्याची सवय येथे विद्यार्थ्यांना अनुभवातून शिकवली जाणार आहे.
संतुलित जीवनदृष्टी विकसित करण्याचा प्रयत्न
डिजिटल युगातील वेगवान जीवनशैली, माहितीचा प्रचंड ओघ आणि स्पर्धेच्या वातावरणामुळे तरुणांचा निसर्ग, समाज आणि स्वतःच्या अंतर्मनाशी असलेला संबंध कमी होत असल्याची जाणीव वाढत आहे. या पार्श्वभूमीवर लाईफ ट्रान्सफॉर्मेशन सेंटर Life Transformation Center तरुणांना थोडा थांबून स्वतःकडे आणि जीवनाकडे संतुलित दृष्टिकोनातून पाहण्यास प्रेरित करणार आहे. साधेपणा, मितव्ययिता आणि जागरूक जीवनपद्धती या मूल्यांचा अनुभव विद्यार्थ्यांना येथे प्रत्यक्षातून दिला जाणार आहे.
या पत्रकार परिषदेला एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कुलगुरू डॉ. आर. एम. चिटणीस, डॉ. दत्ता दंडगे आणि डॉ. श्रुती निगुडकर उपस्थित होते.
Leave a Reply