पिंपरी (पुणे) : सिंधी समाजातील सामाजिक ऐक्य, क्रीडा संस्कृती आणि तरुणांमध्ये तंदुरुस्तीचा संदेश देणारी ‘सिंधी प्रीमिअर लीग’ क्रिकेट स्पर्धा Sindhi Premier League 2026 यंदा सातव्या हंगामात प्रवेश करत आहे. या स्पर्धेचे सातवे पर्व १० एप्रिल ते ३ मे २०२६ या कालावधीत पिंपरीतील एमसीसी, मृणाल क्रिकेट ग्राउंड येथे रंगणार असून, यामध्ये १६ पुरुष आणि ७ महिला संघ मैदानात उतरतील.
Sindhi Premier League 2026 स्पर्धेचे सामने ‘सिंधी प्रीमिअर लीग’च्या अधिकृत फेसबुक पेजवरून थेट प्रक्षेपित केले जाणार असल्याची माहिती संयोजन समितीचे नरेश नशा आणि बिपीन दखनेजा यांनी पत्रकार परिषदेत दिली.
भव्य उद्घाटन १० एप्रिलला
रावेत येथील हॉटेल ब्ल्यू वॉटर येथे झालेल्या पत्रकार परिषदेत उद्योजक डब्बू आसवानी, श्रीचंद आसवानी यांच्यासह संयोजन समितीचे रोनक पंजाबी, अविनाश इसरानी, अंकुश मुलचंदानी, करण आसवानी, अवि तेजवानी, सोमेश गिडवाणी, कुणाल गुडेला, मनीष गेरेजा, यश थडानी, कंवल खियानी, गुलशन गंगवानी, कामेश पमनानी, पवन कोटवानी, मयूर तिलवानी यांच्यासह संघमालक आणि प्रायोजक उपस्थित होते.
Sindhi Premier League 2026 स्पर्धेचे उद्घाटन १० एप्रिल रोजी सायंकाळी ६ वाजता होणार असून, या कार्यक्रमाला माजी क्रिकेटपटू, सिंधी समाजातील मान्यवर, खेळाडू, संघमालक आणि कुटुंबीय उपस्थित राहणार आहेत.
क्रीडा आणि समाजसेवेचा संगम
उद्योजक डब्बू आसवानी यांनी सांगितले की, सिंधी समाजातील तरुण उद्योजकांनी एकत्र येऊन या लीगची सुरुवात केली. आज ही स्पर्धा केवळ क्रिकेटपुरती मर्यादित राहिलेली नाही, तर सामाजिक महोत्सवाचे स्वरूप तिने धारण केले आहे.
Sindhi Premier League 2026 या स्पर्धेमुळे तरुणांना मोबाईल आणि इंटरनेटपासून दूर राहून मैदानावर खेळण्यास प्रोत्साहन मिळते. तसेच निरोगी, व्यसनमुक्त जीवनशैलीचा संदेशही समाजात पोहोचतो.
यंदा या स्पर्धेतून उभारण्यात येणाऱ्या निधीतून ‘साधू वासवानी मिशन’मधील एका विद्यार्थिनीचे संपूर्ण पालकत्व स्वीकारण्याचा निर्णय आयोजकांनी घेतला आहे.
आयपीएलच्या धर्तीवर स्पर्धा
संयोजक बिपीन दखनेजा यांनी सांगितले की, या लीगची Sindhi Premier League 2026 रचना आयपीएलच्या धर्तीवर करण्यात आली आहे.
पुरुषांचे १६ संघ
महिलांचे ७ संघ
एकूण २३ संघ स्पर्धेत सहभागी
पुरुष संघांची नावे सिंधी संस्कृतीवर आधारित, तर महिला संघांची नावे भारतातील नद्यांवर आधारित ठेवण्यात आली आहेत.
या स्पर्धेत पुरुष गटात २५६ खेळाडू, तर महिला गटात ९८ खेळाडूंनी सहभाग नोंदवला आहे.
पुरुष गटातील संघ
पुरुष गटात मस्त कलंदर, सुलतान ऑफ सिंध, मोहेंजोदरो वॉरियर्स, सिंधफूल रेंजर्स, एसएसडी फाल्कन, इंडस डायनामॉस, दादा वासवानीज ब्रिगेड, झुलेलाल सुपरकिंग्ज, हेमू कलानी ग्लॅडिएटर्स, गुरुनानक नाइट्स, संत कंवरम रॉयल्स, आर्यन्स युनायटेड, जय बाबा स्ट्रायकर्स, सिंधी इंडियन्स, अजराक सुपरजायंट्स आणि पिंपरी योद्धाज हे संघ मैदानात उतरतील.
महिला गटातील संघ
महिला गटात गंगा वॉरियर्स, गोदावरी जायंट्स, झेलम क्वीन्स, सिंधू स्टारलेट्स, यमुना स्ट्रायकर्स, नर्मदा टायटन्स आणि कृष्णा सुपरनोव्हाज या संघांचा सहभाग आहे.
प्रायोजकांचा भक्कम पाठिंबा
या स्पर्धेला Sindhi Premier League 2026 अनेक उद्योजक आणि कंपन्यांचे सहकार्य लाभले आहे. सुखवानी लाईफ स्पेसेस, एएनपी कॉर्प, सिटी कार्स, ग्रोफीन, सिंग स्टील अँड अल्युमिनियम, उत्तम केटरर्स, रामा ग्रुप, रोहित इन्फ्रा, एआर रियल्टी, एसएसडी एक्स्पोर्ट, सेवानी इन्शुरन्स, साईबाबा सेल्स, सिंधू स्काईज, क्लासिक कलेक्शन, सच्चिदानंद प्रॉपर्टीज, झमतानी अँड कंपनी, इको मॅट्रिक्स, आर्को रियल्टी, विक्रम रोहिडा फोटोग्राफी आणि सीजे हब यांचा यात सहभाग आहे.
विशेष : ५६ वर्षांचा खेळाडू मैदानात
या स्पर्धेचे Sindhi Premier League 2026 वैशिष्ट्य म्हणजे ५६ वर्षीय हिरानंद उर्फ डब्बू आसवानी हे खेळाडू यंदा मैदानात उतरणार आहेत. ‘सुलतान ऑफ सिंध’ संघाने त्यांची निवड केली आहे.
तर स्पर्धेतील सर्वात कमी वयाचा खेळाडू १५ वर्षीय ऋषभ वाधवानी आहे.
खेळामुळेच राजकारण आणि सामाजिक क्षेत्रात यश मिळाले असून, शारीरिक तंदुरुस्ती टिकवण्यासाठी खेळाशी सातत्य ठेवतो, असे आसवानी यांनी सांगितले.
हे ही वाचा : Khadakwasla Dam Pune खडकवासला धरणावर माणुसकीचा हात; सुरक्षारक्षकाच्या सतर्कतेने युवती सुखरूप घरी