पुणे : भारतातील पहिली ( Whitecoat Celebrity Cricket League )डॉक्टर-सेलिब्रिटी टी-20 लेदर बॉल क्रिकेट लीग असलेल्या व्हाईटकोट सेलिब्रिटी क्रिकेट लीग (WCCL) 2026 ची अधिकृत घोषणा आज करण्यात आली. “जिथे आरोग्यसेवा, क्रिकेट आणि ग्लॅमर एकत्र येतात” या संकल्पनेवर आधारित ही अनोखी लीग डॉक्टरांच्या कर्तृत्वाला सन्मान देतानाच दर्जेदार क्रिकेट मनोरंजन देणार आहे अशी माहिती या लीगचे संस्थापक व व्यवस्थापकीय संचालक सचिन वाघमारे यांनी पत्रकार परिषदेत दिली.यावेळी सीए अखिल कुमार, दीपेश शेरे (WCCL ऑपरेशन्स आणि मार्केटिंग ) उपस्थित होते.
( Whitecoat Celebrity Cricket League ) आयोजकांच्या मते, डॉक्टर खेळाडू कोणत्याही IPL क्रिकेटपटूपेक्षा कमी नाहीत. त्यांची शिस्त, फिटनेस आणि टीमवर्क ही लीग भारतीय क्रीडा विश्वात नवा इतिहास घडवेल.
पुढे बोलताना सचिन वाघमारे म्हणाले, ही भारतातील पहिली अशी लीग आहे, ( Whitecoat Celebrity Cricket League ) जिथे देशभरातील डॉक्टर आणि नामवंत सेलिब्रिटी एकाच व्यासपीठावर खेळताना दिसतील. WCCL ट्रायल्सला देशभरातून 5,000 हून अधिक डॉक्टरांनी नोंदणी केली असून, भारतात प्रथमच आयोजित होत असलेल्या डॉक्टरांच्या व्यावसायिक क्रिकेट लीगसाठी देशभरात ग्राउंड ट्रायल्स पूर्ण झाल्या असून निवड प्रक्रिया सुरू आहे. पुणे, मुंबई, अहमदाबादसह विविध शहरांमध्ये मोठ्या उत्साहात चाचण्या घेतल्या जात आहेत.
या लीगमध्ये ( Whitecoat Celebrity Cricket League ) 10 डॉक्टर-नेतृत्वाखालील संघ असतील. प्रत्येक संघात 1 ते 2 सेलिब्रिटी खेळाडू सहभागी होतील. पुण्यात राऊंड-रॉबिन पद्धतीने लीग सामने खेळवले जातील, तर उपांत्य फेरी आणि अंतिम सामना देशाच्या बाहेर होणार आहे. 200 ते 500 निवडक डॉक्टरांचा भव्य लिलाव (ग्रँड ऑक्शन) पुण्यात पार पडणार असून तो थेट प्रक्षेपित केला जाईल. या लीगमध्ये केवळ भारतीय डॉक्टरच नव्हे तर यूकेसह परदेशातील डॉक्टरही सहभागी होत आहेत. शहरी भागासोबतच ग्रामीण व खेडेगावातील डॉक्टर-खेळाडूंनी मोठ्या संख्येने नोंदणी केली आहे. तसेच लीगमध्ये अभिनेता सिद्धार्थ जाधव, संजय जाधव, प्रवीण तरडे यांसह अनेक नामवंत कलाकार सहभागी होणार आहेत.
( Whitecoat Celebrity Cricket League ) ‘व्हाईटकोट सेलिब्रिटी क्रिकेट लीग 2026’ची प्राथमिक फेरी 4 ते 8 मे 2026 दरम्यान दोन गटात साखळी सामन्याने होणार आहे. हे सामने पुण्यात तर सेमी फायनल आणि फायनल सामने दुबई येथे खेळविण्यात येणार आहेत. डॉक्टर्सना त्यांच्या वैद्यकीय सेवेपलीकडे जाऊन वेगळ्या स्वरूपात सन्मान या लीग च्या माध्यमातून होणार आहे. डॉक्टर खेळाडू इतर कोणत्याही IPL क्रिकेटपटूपेक्षा कमी नाहीत. त्यांच्या कौशल्य, शिस्त आणि जिद्दीमुळे ही लीग देशातील क्रीडा विश्वात नवा इतिहास घडवेल, असे आयोजकांनी स्पष्ट केले.
सध्या मुंबई मेडस्टार्स, पुणे, अहमदाबाद, चेन्नई, पंजाब, दिल्ली, बेंगळुरू, हैदराबाद, जयपूर आणि कोलकाता या शहरांच्या नावाने संघ तयार करण्यात येत आहेत. काही संघांच्या स्लॉट्स अद्याप खुले असून, इच्छुक गुंतवणूकदार व संघमालकांनी आयोजकांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
हे ही वाचा :Shriguruji Award दादा लाड, भारतभूषणदासजी महाराज यांना जनकल्याण समितीचा ‘पूजनीय श्रीगुरुजी पुरस्कार
Leave a Reply