Sindhi Premier League 2026

Sindhi Premier League 2026 सातव्या सिंधी प्रीमिअर लीग क्रिकेट स्पर्धेत झेलम क्वीन्स, हेमू कलानी ग्लॅडिएटर्सची विजयी सलामी; अनाथ मुलांच्या हस्ते लीग’चे उद्घाटन

पिंपरी-पुणे : ‘सिंधी प्रीमिअर लीग’च्या Sindhi Premier League 2026 सातव्या पर्वाचे उद्घाटन अनाथ मुलांच्या हस्ते झाले. येत्या ३ मेपर्यंत चालणारी ही क्रिकेट स्पर्धा पिंपरीतील मृणाल क्रिकेट ग्राउंडवर होत आहे. उद्घाटन सोहळ्यावेळी उद्योजक डब्बू आसवानी, श्रीचंद आसवानी, संयोजक नरेश नाशा, बिपीन दखनेजा, रोनक पंजाबी, अविनाश इसरानी, अंकुश मुलचंदानी, करण आसवानी, अवि तेजवानी, सोमेश गिडवाणी, कुणाल गुडेला, मनीष गेरेजा, यश थडानी, कंवल खियानी, गुलशन गंगवानी, कामेश पमनानी, पवन कोटवानी, मयूर तिलवानी यांच्यासह संघमालक व प्रायोजक उपस्थित होते.

बिपीन दखनेजा म्हणाले, “सिंधी समाजातील तरुणांना खेळांसाठी प्रोत्साहन देण्यासह सिंधी संस्कृतीचे जतन आणि सामाजिक भावनेतून सेवाभावी संस्थांना मदत करण्याच्या उद्देशाने गेल्या सात वर्षांपासून ही क्रिकेट स्पर्धा Sindhi Premier League 2026 होत आहे. आयपीएलच्या धर्तीवर होत असलेल्या या स्पर्धेत पुरुष गटात एकूण १६, तर महिला गटात एकूण सात संघ सहभागी झाले आहेत. पुरुषांच्या प्रत्येक संघाचे नाव सिंधी संस्कृतीशी, तर महिला संघांची नावे नद्यांशी निगडित आहेत.”

श्रीचंद आसवानी म्हणाले, “क्रिकेट हा सर्वांना एकत्र आणणारा खेळ आहे. सर्व कुटुंबाना एकत्र आणून उत्साहाने ही स्पर्धा खेळली जात आहे. मानसिकदृष्ट्या ताजेतवाने आणि शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त राहण्यासाठी मैदानी खेळ खेळायला हवेत. समाजातील तरुणांमध्ये खेळभावना रुजवण्यासाठी ही लीग Sindhi Premier League 2026 महत्वाची आहे. संघभावना आणि प्रामाणिकपणे या खेळाचा आनंद घ्यावा.”

या स्पर्धेतील Sindhi Premier League 2026 पुरुष गटामध्ये मस्त कलंदर, सुलतान ऑफ सिंध, मोहेंजोदरो वॉरियर्स, सिंधफूल रेंजर्स, एसएसडी फाल्कन, इंडस डायनामॉस, दादा वासवानीज ब्रिगेड, झुलेलाल सुपरकिंग्ज, हेमू कलानी ग्लॅडिएटर्स, गुरुनानक नाइट्स, संत कंवरम रॉयल्स, आर्यन्स युनायटेड, जय बाबा स्ट्रायकर्स, सिंधी इंडियन्स, अजराक सुपरजायंट्स व पिंपरी योद्धाज, तर महिलांच्या संघात गंगा वॉरियर्स, गोदावरी जायंट्स, झेलम क्वीन्स, सिंधू स्टारलेट्स, यमुना स्ट्रायकर्स, नर्मदा टायटन्स, कृष्णा सुपरनोव्हाज यांचा समावेश आहे.

उद्घाटनाच्या सामन्यात Sindhi Premier League 2026 महिला गटात झेलम क्वीन्सने सिंधू स्टारलेट्सचा ७ धावांनी, तर पुरुष गटात हेमू कलानी ग्लॅडिएटर्सने एसएसडी फाल्कन्सचा ४० धावांनी पराभव करीत स्पर्धेत विजयी सलामी दिली. कर्णधार शीतल आसवानीच्या दोन षटकारांसह १२ चेंडूतील २१ धावांच्या जोरावर झेलम क्वीन्सने ४५ धावा केल्या. विजयासाठी ४६ धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात आलेल्या स्टारलेट्सच्या सलामीवीर तानिया धरमदासानी (१५) व कर्णधार निकिता सुखेजा (१७) यांनी चांगली सुरुवात केली.

Sindhi Premier League 2026 मात्र संथ धावगतीमुळे विजयी लक्ष्य गाठता आले नाही. एक धाव देत २ गडी बाद करणारी गीत रांझानी सामनावीर ठरली. चिराग दोडेजाच्या १६ चेंडूतील २७, तर आदि लुल्लानीच्या ११ चेंडूतील २८ धावांमुळे हेमू कलानी ग्लॅडिएटर्सने ९ षटकांत ८६ धावांचे लक्ष्य उभारले. उत्तरात फाल्कन्सच्या जयेश मायारामानी (१६) व सुमित कटारिया (१८) यांचा अपवाद वगळता एकही खेळाडूला दोनअंकी धावा काढण्यात अपयश आल्याने पराभूत व्हावे लागले. २७ धावा व १ बळी घेणारा चिराग दोडेजा सामनावीर ठरला.

संक्षिप्त धावफलक : Sindhi Premier League 2026

महिला गट

झेलम क्वीन्स – (६.५ षटकांत) सर्वबाद ४५ (शीतल आसवानी २१, पलक धरमदासानी ९, सागर लिलानी ७-३, तानिया धरमदासानी १०-२) विजयी विरुद्ध सिंधू स्टारलेट्स (निकिता सुखेजा १७, तानिया धरमदासानी १५, गीत रांझानी १-२, फलक भाटिया ५-२)

पुरुष गट

हेमू कलानी ग्लॅडिएटर्स – (९ षटकांत) ५ बाद ८६ (आदि लुल्लानी २८, चिराग दोडेजा २७) विजयी विरुद्ध एसएसडी फाल्कन्स – (९ षटकांत) ८ बाद ४६ (सुमित कटारिया १८, जयेश मायारामानी १६, सुमित कलानी ९-२).

हे ही वाचा : Pune Metro expansion शिवाजीनगर एसटी स्थानकावर पीपीपी तत्त्वावर भव्य मल्टीमोडल संकुल; पुणे मेट्रो विस्ताराला वेग, मेट्रो, एसटी आणि पीएमपी एकत्र आणणारे प्रकल्प; शहरासह जिल्ह्यातील नवीन मार्गांसाठी प्रक्रिया सुरू