Shehnai Festival Pune

Shehnai Festival Pune शहनाईच्या सुरांत रंगला पुणेकरांचा स्वरसोहळा; पहिल्याच महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद; मारुबिहाग ते बनारसी दादरा… पारंपरिक सुरावटींनी रसिकांना दिला अविस्मरणीय आनंद

पुणे : शहनाईच्या मधुर सुरांनी Shehnai Festival Pune भारलेले वातावरण, रागदारीपासून भक्तिगीतांपर्यंतची स्वरयात्रा आणि पारंपरिक वाद्यांची जपणूक करण्याचा सुंदर प्रयत्न—या साऱ्यांचा संगम पहिल्या ‘शहनाई-सुंद्री महोत्सवा’त अनुभवायला मिळाला. कोथरूड येथील भारती विद्यापीठाच्या स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्ट्समध्ये आयोजित या महोत्सवाला पुणेकर रसिकांनी भरभरून प्रतिसाद दिला.

Shehnai Festival Pune सनई सम्राट पंडित शंकररावजी गायकवाड, सूरमणी पंडित प्रभाशंकरजी गायकवाड यांच्यासह अनेक दिग्गज शहनाईवादकांच्या स्मृतींना अभिवादन म्हणून या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. पारंपरिक शहनाई आणि सुंद्री या वाद्यांचा वारसा पुढे नेण्याचा हा एक प्रयत्न ठरला.

जपणूक आणि प्रसाराचा संकल्प

आधुनिक संगीताच्या प्रवाहात पारंपरिक वाद्ये मागे पडत असल्याची खंत व्यक्त करत, शहनाईला Shehnai ‘बैठकीचे वाद्य’ म्हणून प्रतिष्ठा मिळावी, यासाठी हा महोत्सव आयोजित केल्याचे डॉ. प्रमोद गायकवाड यांनी सांगितले. या उपक्रमातून नव्या पिढीला शास्त्रीय संगीताची गोडी लागावी, हा मुख्य उद्देश होता.

 विद्यार्थ्यांची सुरेल सुरुवात

कार्यक्रमाची सुरुवात गुरुकुलातील हितेश, चेतन, अनिकेत साळुंके आणि सुरेश डोळसे यांच्या शहनाई Shehnai वादनाने झाली. राग मधुवंतीपासून ‘रामा रघुनंदना’ आणि ‘बाजे रे मुरलिया’सारख्या रचनांनी वातावरण भक्तिरसाने भारले. तबल्यावर विनायक गुरव यांनी सुंदर साथ दिली.

पंडित लोकेश आनंद यांची मोहक मैफल

दिल्लीचे आघाडीचे शहनाईवादक पंडित लोकेश आनंद यांनी राग मारुबिहाग Maru Bihag सादर करत रसिकांना अक्षरशः मंत्रमुग्ध केले. त्यानंतर बनारसी दादऱ्याने Banarasi Dadra रंगत वाढवत ‘पायो जी मैने’ने मैफलीची सांगता केली. सुरातील स्पष्टता, रागातील बारकावे आणि प्रभावी सादरीकरणाला प्रेक्षकांनी उत्स्फूर्त दाद दिली.

‘ट्रायो’चा अनोखा वाद्यसंगम

महोत्सवात दाक्षिणात्य आणि पाश्चिमात्य संगीताचा सुंदर संगमही अनुभवायला मिळाला. हरिता राज (सरस्वती वीणा), कृष्ण राज (व्हायोलिन) आणि मार्क जॉन नटराज (गिटार) या तिघांच्या ‘ट्रायो’ने गणेशस्तुतीपासून कर्नाटकी रागांपर्यंतची अनोखी जुगलबंदी सादर केली. ‘वेस्टर्न नोट्स’च्या सादरीकरणाने रसिकांना वेगळाच अनुभव दिला.

मान्यवरांच्या हस्ते सत्कार

कार्यक्रमात सहभागी कलाकारांचा सत्कार ज्येष्ठ व्हायोलिन वादक पं. रत्नाकर गोखले, डॉ. पं. शारंगधर साठे, गायिका उर्वशी शहा, अनिल पानसे आणि उपायुक्त नितीन उदास यांच्या हस्ते करण्यात आला.

परंपरा आणि आधुनिकतेचा संगम

शहनाई-सुंद्री महोत्सवाने Shehnai Festival Pune पारंपरिक वाद्यांची गोडी नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा यशस्वी प्रयत्न केला. परंपरा आणि आधुनिकतेचा संगम साधत, या सुरेल उपक्रमाने पुणेकरांच्या मनात एक खास स्थान निर्माण केले.

हे ही वाचा : Pune Municipal Corporation उरूळी देवाची प्रकल्पावरून राजकीय वाद पेटला; ‘भूमिग्रीन’ला पायघड्या? निविदा प्रक्रिया डावलल्याचा आरोप; कचरा प्रकल्पांचे ऑडिट करण्याची मागणी