राजेश पांडे

Pune Children’s Book Fair पुण्यात रंगणार साहित्याचा उन्हाळी उत्सव; ३० एप्रिलपासून दिमाखदार ‘बालपुस्तक जत्रा’! गणेश कला क्रीडा रंगमंच येथे १०० दालने आणि ५ दिवस सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल; प्रवेश विनामूल्य

पुणे : उन्हाळ्याच्या सुट्टीत मुलांना हसत खेळत वाचनाची गोडी लागावी, त्यांच्यावर कला-संस्कृतीचे संस्कार व्हावेत आणि त्यांना साहित्याचा निखळ आनंद घेता यावा, या उदात्त हेतूने ‘पुणे बालपुस्तक जत्रे’चे Pune Children’s Book Fair भव्य आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्रीय पुस्तक न्यास (NBT), पुणे पुस्तक महोत्सव, पुणे महानगरपालिका, संवाद पुणे आणि समर्थ युवा फाउंडेशन यांच्या वतीने ३० एप्रिल ते ४ मे या कालावधीत स्वारगेट येथील गणेश कला क्रीडा रंगमंच Ganesh Kala Krida Rangmanch Swargate येथे हा महोत्सव रंगणार आहे.

या उपक्रमाचे Pune Children’s Book Fair हे दुसरे वर्ष असून, या पाच दिवसीय महोत्सवात केवळ पुस्तकेच नव्हे, तर मुलांच्या भावविश्वाला समृद्ध करणारे अनेक सांस्कृतिक कार्यक्रम विनामूल्य अनुभवता येणार आहेत, अशी माहिती मुख्य संयोजक राजेश पांडे Rajesh Pande यांनी पत्रकार परिषदेत दिली.

वाढता प्रतिसाद आणि दालनांचा विस्तार

गेल्या वर्षी या महोत्सवाला Pune Children’s Book Fair पुणेकरांनी अभूतपूर्व प्रतिसाद दिला होता. सुमारे ५५ ते ६० हजार मुले आणि पालकांनी या जत्रेला Pune Children’s Book Fair भेट देऊन साहित्याचा आनंद लुटला होता. गेल्या वर्षीच्या यशामुळे यंदा महोत्सवाचा विस्तार करण्यात आला असून, बालसाहित्याच्या दालनांची संख्या ७५ वरून थेट १०० पर्यंत वाढवण्यात आली आहे.

विविध भाषांमधील दर्जेदार पुस्तके एकाच छताखाली उपलब्ध होणार असल्याने, मुलांच्या कल्पनाशक्तीला नवे पंख मिळतील. ही जत्रा केवळ विक्रीचे केंद्र न राहता, ती मुलांसाठी एक संस्कार केंद्र बनावी, असा मानस आयोजकांनी Rajesh Pande व्यक्त केला आहे.

वैविध्यपूर्ण कार्यशाळा आणि कलेचा अविष्कार

या जत्रेत Pune Children’s Book Fair केवळ पुस्तकेच वाचायला मिळतील असे नाही, तर मुलांमधील सुप्त गुणांना वाव देण्यासाठी अनेक नाविन्यपूर्ण उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये मुलांचे स्वतःचे ‘गीतरामायण’ हे विशेष आकर्षण असेल. तसेच पथनाट्य कार्यशाळा, ‘नाट्यनगरी’ कार्यशाळा आणि बाहुली नाट्याचे (पपेट शो) सादरीकरण केले जाणार आहे. मुलांमध्ये लेखनाची आवड निर्माण करण्यासाठी ‘बालसाहित्य लेखन स्पर्धा’ आणि त्यांच्यातील कवींना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी ‘मुलांचे कविसंमेलन’ देखील आयोजित केले जाणार आहे, ज्यामुळे मुलांना अभिव्यक्त होण्याची मोठी संधी मिळेल.

लाडका चिंटू आणि लेखकांशी थेट संवाद

आजच्या पिढीला वाचनाकडे वळवण्यासाठी ‘लेखक तुमच्या भेटीला’ हा एक अनोखा उपक्रम राबवण्यात येणार आहे. यात मुले आपल्या लाडक्या साहित्यिकांशी थेट गप्पा मारू शकतील. विशेष म्हणजे, मराठी मुलांच्या गळ्यातील ताईत असलेला ‘चिंटू’ हा काल्पनिक पात्र स्वरूपात प्रत्यक्ष मुलांच्या भेटीला येणार आहे. यासोबतच महाराष्ट्रातील मुलांचे आवडते ‘किशोर’ मासिक आणि त्याच्या मुखपृष्ठांचे प्रदर्शन हे जुन्या आणि नव्या पिढीसाठी आकर्षणाचे केंद्र ठरेल. जादूचे प्रयोग आणि विविध प्रशिक्षणांमुळे मुलांच्या सुट्टीत ज्ञानाची आणि मनोरंजनाची सांगड घातली जाणार आहे.

साहसी खेळ आणि खाद्यसंस्कृतीचा आस्वाद

साहित्य आणि कलेसोबतच मुलांच्या शारीरिक विकासासाठी आणि मनोरंजनासाठी ग्रामीण व साहसी खेळांचे आयोजन करण्यात आले आहे. विस्मृतीत चाललेले पारंपारिक खेळ खेळण्याची संधी मुलांना या जत्रेत मिळेल. तसेच, केवळ वाचनच नव्हे, तर महाराष्ट्राची समृद्ध खाद्यसंस्कृती मुलांपर्यंत पोहोचावी यासाठी खास ‘खाद्यजत्रे’चे आयोजन करण्यात आले आहे. यामुळे ही बालपुस्तक जत्रा मुलांसाठी उन्हाळी सुट्टीतील एक संपूर्ण कौटुंबिक सहल आणि आनंदाची पर्वणी ठरणार आहे.

पालक आणि शिक्षकांसाठी विशेष संधी

मुलांना घडवण्यात शिक्षक आणि पालकांची भूमिका सर्वात महत्त्वाची असते, हे लक्षात घेऊन त्यांच्यासाठी या महोत्सवात विशेष उपक्रम आखले आहेत. पालकांसाठी आणि शिक्षकांसाठी सर्व भाषांमधील बालसाहित्याचे विशेष प्रदर्शन भरवण्यात येणार आहे, जेणेकरून त्यांना आपल्या पाल्यांसाठी योग्य साहित्याची निवड करता येईल.

या महोत्सवात Pune Children’s Book Fair सहभागी होण्यासाठी क्यूआर कोड (QR Code) स्कॅन करून नोंदणी करणे आवश्यक असून, जास्तीत जास्त पुणेकरांनी आपल्या मुलांसह या साहित्य संस्कृतीच्या प्रवासात सहभागी व्हावे, असे आवाहन संयोजक सुनील महाजन आणि प्रसाद मिरासदार यांनी केले आहे.

हे ही वाचा : RMC Plant Action धायरी, वडगाव खुर्दच्या आरएमसी प्लांटवर महापालिकेचा ‘हातोडा’ चालणार; आयुक्त नवलकिशोर राम यांचा इशारा, राजकीय दबावाला झुगारून कडक कारवाईचे नियोजन; लोहगाव, वाघोलीच्या धडाक्यानंतर आता मोर्चा धायरीकडे 

शिवराज सणस हे पुणे-स्थित वरिष्ठ पत्रकार आहेत. पुण्यासह महाराष्ट्रातील राजकीय व सामाजिक घडामोडी हे त्यांच्या अभ्यासाचे विषय आहेत.