पुणे : सिंहगड रस्त्यावरील ब्रह्मा हॉटेल ते खेड शिवापूर पोलिस चौकीदरम्यान व्यावसायिकाकडील एक कोटी रुपयांची रोकड लुटण्याचा (One Crore Cash Robbery) प्रयत्न केल्याप्रकरणी राजगड पोलिस ठाण्यातील दोन पोलिस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. तपासात त्यांचा कथित सहभाग उघड झाल्यानंतर दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून ते सध्या फरार आहेत. पोलिसच दरोड्याच्या कटात सहभागी असल्याचा आरोप झाल्यामुळे पुणे ग्रामीण पोलिस दलात खळबळ उडाली आहे.
(One Crore Cash Robbery) पोलिस नाईक अजीज जब्बार इसुब मेस्त्री (वय ३९) आणि महिला पोलिस अंमलदार प्रमिला शरद निकम (वय ४४, रा. विसावा कॅम्प, सातारा) अशी निलंबित करण्यात आलेल्या संशयित पोलिस कर्मचाऱ्यांची नावे आहेत.
दोघेही राजगड पोलिस ठाण्यात कार्यरत होते.
गुन्ह्यात (One Crore Cash Robbery) सहभाग असल्याचे पुरावे तपासात समोर आल्यानंतर त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. गुन्हा दाखल झाल्यापासून दोघेही फरार असून पोलिसांकडून त्यांचा शोध घेतला जात आहे.
एक कोटींची रोकड घेऊन बँकेकडे प्रवास
तक्रारदार व्यावसायिक १८ जुलै रोजी सहकाऱ्यासह मोटारीतून एक कोटी रुपयांची रोकड बँकेत भरण्यासाठी निघाले होते. त्यांच्या मोटारीवर आरोपींची आधीपासून नजर होती. ब्रह्मा हॉटेल ते खेड शिवापूर पोलिस चौकीदरम्यान आरोपींनी व्यावसायिकाची मोटार अडवली. आपण पोलिस असल्याची बतावणी करून त्यांनी मोटारीची कथित तपासणी सुरू केली. त्यानंतर रोकड असलेली बॅग (One Crore Cash Robbery) हिसकावण्याचा प्रयत्न करण्यात आला.
व्यावसायिकाच्या प्रतिकाराने प्रयत्न फसला
अचानक घडलेल्या प्रकारामुळे व्यावसायिक आणि त्यांचा सहकारी सुरुवातीला गोंधळले. मात्र, संशय आल्यानंतर व्यावसायिकाने प्रसंगावधान राखत आरोपींना जोरदार प्रतिकार केला. त्यामुळे रोकड असलेली बॅग घेऊन पळून जाण्याचा आरोपींचा प्रयत्न फसला. व्यावसायिकाच्या सतर्कतेमुळे एक कोटी रुपयांची रोकड (One Crore Cash Robbery) वाचली. घटनेनंतर नऱ्हे पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपासाची चक्रे वेगाने फिरवली.
सीसीटीव्हीतून कटाचा उलगडा
तपास पथकाने घटनास्थळासह सिंहगड रस्ता आणि परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले. त्यामध्ये कथित पत्रकार आशिष तिवारी हा व्यावसायिकाच्या मोटारीचा पाठलाग करताना दिसून आल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले. लुटण्याचे लक्ष्य असलेली रोकड (One Crore Cash Robbery) सुरुवातीला त्याच्या दुचाकीवर ठेवण्यात आल्याची माहितीही तपासात समोर आली. या तांत्रिक पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी तिवारीला अटक केली. न्यायालयाने त्याला पोलिस कोठडी सुनावली आहे.
चौघांना अटक; सहा जण फरार
या प्रकरणात (One Crore Cash Robbery)आतापर्यंत आशिष तिवारीसह विक्रम चाकणकर, अमेय अरविंद कार्ले आणि गणेश रमेश कदम या चौघांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी अटक आरोपींची चौकशी करून दरोड्याच्या कटाची आखणी, आरोपींची जबाबदारी, व्यावसायिकाच्या प्रवासाची माहिती आणि रोकड नेण्यात येणाऱ्या मार्गाबाबत तपास सुरू केला आहे.
धायरी, भोर आणि हवेलीतील संशयितांचा शोध
अजीज मेस्त्री आणि प्रमिला निकम यांच्यासह अभिजित ऊर्फ बटऱ्या बाळासाहेब गाडे (रा. आंबेडकर वसाहत, धायरी), दाऊद सय्यद नदाफ (रा. बेनकर वस्ती, धायरी), आकाश ऊर्फ मुन्ना संजय गायकवाड (रा. कासुर्डी, भोर) आणि प्रमोद विजयकुमार यादव (रा. गाऊडदरा फाटा, हवेली) हे फरार आहेत. त्यांच्या शोधासाठी पोलिसांची स्वतंत्र पथके रवाना करण्यात आली आहेत.
खाकीच्या सहभागामुळे तपासाकडे लक्ष
दरोड्याचा प्रयत्न करणाऱ्या टोळीला (One Crore Cash Robbery) पोलिस दलातील कर्मचाऱ्यांनी मदत केली का, व्यावसायिकाच्या आर्थिक व्यवहारांची माहिती आरोपींपर्यंत कशी पोहोचली आणि कटाचा मुख्य सूत्रधार कोण आहे, या दिशेने तपास केला जात आहे. दोन पोलिस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई झाल्याने या गुन्ह्याच्या पुढील तपासाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.