पुणे: राज्यात कर्करोगाचे वाढते प्रमाण लक्षात घेता, रुग्णांना वेळेत निदान आणि प्रभावी उपचार मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र सरकार राज्यभर व्यापक ‘कर्करोग ग्रीड’ (Cancer Grid) Maharashtra Cancer Grid उभारणार आहे. पुणे महापालिकेच्या माध्यमातून बाणेर येथे उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक कर्करोग रुग्णालयामुळे आरोग्य क्षेत्रात एक नवा मैलाचा दगड प्रस्थापित झाला असून, हे रुग्णालय सर्वसामान्यांसाठी वरदान ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी व्यक्त केला.
Maharashtra Cancer Grid पुणे महानगरपालिका आणि आपुलकी हेल्थकेअर प्रायव्हेट लिमिटेड यांच्या सार्वजनिक-खासगी भागीदारीतून Public Private Partnership (PPP) बाणेर येथे उभारण्यात आलेल्या १५० खाटांच्या अत्याधुनिक कर्करोग रुग्णालयाचे रविवारी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
काय आहे ‘कर्करोग ग्रीड’ संकल्पना?
मुख्यमंत्री फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले की, “कर्करोगाच्या उपचारात सर्वात मोठे आव्हान हे वेळेचे असते. वेळेत निदान झाल्यास हा आजार पूर्णपणे बरा होऊ शकतो. मात्र, अनेकदा समन्वयाच्या अभावामुळे रुग्णांना उपचारांसाठी भटकंती करावी लागते. हे रोखण्यासाठी आम्ही संपूर्ण महाराष्ट्रात ‘कर्करोग ग्रीड’ (Maharashtra Cancer Grid) तयार करत आहोत. या माध्यमातून राज्यातील सर्व प्रमुख कर्करोग उपचार केंद्रे एकमेकांशी जोडली जातील, जेणेकरून रुग्णांना योग्य वेळी, योग्य ठिकाणी आणि तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली उपचार मिळणे सुलभ होईल.”
जागतिक दर्जाच्या सुविधा आता सरकारी दरात!
(Maharashtra Cancer Grid) बाणेरमधील हे रुग्णालय भारतातील अशा प्रकारचे पहिले ‘पीपीपी’ मॉडेल आहे, जिथे जागतिक दर्जाच्या आरोग्य सुविधा केंद्र सरकारच्या ‘सी.जी.एच.एस.’ (CGHS) दरांवर उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.
रुग्णालयाची महत्त्वाची वैशिष्ट्ये:
(Maharashtra Cancer Grid) अत्याधुनिक यंत्रसामग्री: भारतात पीपीपी Public Private Partnership तत्त्वावर पहिल्यांदाच ‘लिनियर अॅक्सिलरेटर – ट्रूबीम’ आणि ‘हायपरआर्क’ सारख्या प्रगत तंत्रज्ञानाचा समावेश.
तपासणी सुविधा: डिजिटल पेट स्कॅनर, ३ टेस्ला एमआरआय, १६०-स्लाईस सीटी स्कॅनर आणि जीनोम सिक्वेन्सिंग सुविधा.
बेड क्षमता: १५० खाटांचे रुग्णालय, ज्यामध्ये समर्पित २० बेडचा आयसीयू/सीसीयू आणि २३ बेडचा भव्य किमोथेरपी वॉर्ड आहे.
न्यूक्लियर मेडिसिन: देशातील सर्वात मोठ्या विभागांपैकी एक असलेला ८ बेडचा न्यूक्लियर मेडिसिन विभाग येथे उपलब्ध आहे.
गोरगरीब रुग्णांना मिळणार मोठा आधार
(Maharashtra Cancer Grid) या रुग्णालयात केंद्र आणि राज्य सरकारच्या सर्व प्रमुख आरोग्य योजना (उदा. महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजना) लागू असतील. खासगी विमा कंपन्यांच्या सेवांसोबतच शासकीय दरांवर उपचार मिळणार असल्याने आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील रुग्णांना आता उपचारासाठी आर्थिक अडचणींचा सामना करावा लागणार नाही.
प्रकल्पामागील प्रेरणा आणि प्रवास
पुणे महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले (Srinath Bhimale) यांनी या प्रकल्पाच्या उभारणीत महत्त्वाची भूमिका बजावली. “भारतातील हे पहिले पीपीपी मॉडेल रुग्णालय आहे जे शासकीय दरात सेवा देणार आहे. या हॉस्पिटलसाठी पुणे महापालिकेने मोलाची जागा उपलब्ध करून दिली. मुख्यमंत्री नागपुरात असताना मी त्यांची भेट घेऊन या संकल्पनेची माहिती दिली होती, त्यांनी तत्काळ अधिकाऱ्यांना सहकार्य करण्याचे आदेश दिले आणि हा प्रकल्प आज प्रत्यक्षात साकार झाला,” असे भिमाले यांनी आपल्या भाषणात नमूद केले.
दिग्गजांची उपस्थिती
या सोहळ्याला (Devendra Fadnavis) उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, महापौर मंजुषा नागपुरे, उपमहापौर परशुराम वाडेकर, स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले, सभागृह नेते गणेश बीडकर, विरोधी पक्षनेते निलेश निकम, आयुक्त नवलकिशोर राम आणि भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
पुण्यातील हे रुग्णालय केवळ शहरासाठीच नव्हे, तर संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रातील कर्करोग रुग्णांसाठी एक आशेचा किरण ठरणार आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि परवडणारे दर यांचा मेळ घालणारा हा प्रकल्प सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेसाठी आदर्श ठरेल, अशी भावना यावेळी उपस्थितांनी व्यक्त केली.
थोडक्यात ठळक मुद्दे:
ठिकाण: बाणेर, पुणे.
क्षमता: १५० खाटा.
प्रकार: पीपीपी (सार्वजनिक-खासगी भागीदारी) Public Private Partnership.
दर: सीजीएचएस (शासकीय) दरानुसार उपचार.
प्रमुख तंत्रज्ञान: ट्रूबीम लिनियर अॅक्सिलरेटर, जीनोम सिक्वेन्सिंग.
















