Medical Rare Case
Dr Chetan Mhaske

Medical Rare Case साध्या खोकल्यामागे दडला होता काळजाचा ठोका चुकवणारा धोका! पुण्यातील डॉक्टरांनी ३२ वर्षीय तरुणाला दिले मृत्यूच्या दारातून ‘जीवनदान’

पुणे: “फक्त खोकलाच तर आहे, थोड्या दिवसात बरा होईल…” हा आपला नेहमीचा समज. पण कधीकधी हाच साधा समज जीवावर बेतू शकतो, याचा प्रत्यय पुण्यात नुकताच आला. एका ३२ वर्षीय तरुणाला होणारा किरकोळ खोकला आणि पाणी पिताना होणारा त्रास हा खरं तर एका अत्यंत दुर्मिळ आणि जीवघेण्या आजाराचा Medical Rare Case साध्या खोकल्यामागे दडला होता काळजाचा ठोका चुकवणारा धोका! पुण्यातील डॉक्टरांनी ३२ वर्षीय तरुणाला दिले मृत्यूच्या दारातून ‘जीवनदान’ संकेत होता. मात्र, पुण्यातील डॉ. म्हस्के हॉस्पिटलमधील तज्ज्ञ डॉक्टरांच्या टीमने आपल्या अनुभवाच्या जोरावर या संकटाचा छडा लावला आणि एका तरुणाला मृत्यूच्या दाढेतून सुखरूप बाहेर काढले.

Medical Rare Case पुण्यातील एका ३२ वर्षीय तरुणाला गेल्या काही दिवसांपासून सतत खोकला येत होता. बोलताना आवाज बसणे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे पाणी पिताना गुदमरल्यासारखे होऊन ठसका लागणे, अशा समस्या जाणवत होत्या. सुरुवातीला त्याने याकडे दुर्लक्ष केले, मात्र त्रास वाढू लागल्याने त्याने डॉ. म्हस्के हॉस्पिटल गाठले.

हा तरुण दिसायला ठणठणीत होता, आपली दैनंदिन कामे व्यवस्थित करत होता, पण प्रत्येक वेळी पाणी पिताना होणारा त्रास काहीतरी अघटित घडत असल्याची चाहूल देत होता.

निदानाने डॉक्टरही चक्रावले!

रुग्णाची तपासणी करताना डॉ. चेतन म्हस्के Dr Chetan Mhaske यांना काहीतरी वेगळे Medical Rare Case असल्याचे जाणवले. त्यांनी तातडीने ‘गॅस्ट्रोस्कोपी’ करण्याचा निर्णय घेतला. या तपासणीत जे समोर आले, ते पाहून डॉक्टरही थक्क झाले. या तरुणाला ‘ट्रॅकिओ-इसोफेजियल फिस्टुला’ (Tracheo-Esophageal Fistula) हा अत्यंत दुर्मिळ आजार असल्याचे निदान झाले.

सोप्या भाषेत सांगायचे तर, या तरुणाची अन्ननलिका आणि श्वासनलिका यांच्यामध्ये निसर्गत: नसलेला एक ‘असामान्य मार्ग’ (जोड) तयार झाला होता. हा आजार प्रामुख्याने नवजात बालकांमध्ये जन्मजात आढळतो. मात्र, ३२ वर्षांच्या प्रौढ व्यक्तीमध्ये असा आजार आढळणे ही वैद्यकीय शास्त्रातील अत्यंत दुर्मिळ घटना Medical Rare Case मानली जाते.

जीवघेणा धोका: पाणी फुफ्फुसात!

(Tracheo-Esophageal Fistula) या आजारामुळे हा तरुण जेव्हा पाणी प्यायचा, तेव्हा ते अन्ननलिकेतून थेट श्वासनलिकेत आणि पर्यायाने फुफ्फुसात जात होते. यामुळे त्याला गुदमरल्यासारखे व्हायचे. जर यावर वेळीच उपचार झाले नसते, तर फुफ्फुसाचा गंभीर संसर्ग (निमोनिया) होऊन रुग्णाचा मृत्यू ओढवू शकला असता. सीटी स्कॅन आणि ब्रॉन्कोस्कोपीद्वारे या निदानावर शिक्कामोर्तब करण्यात आले.

आव्हानात्मक शस्त्रक्रिया आणि तज्ज्ञांची ‘फौज’

(Tracheo-Esophageal Fistula) हा आजार जितका दुर्मिळ होता, तितकीच त्याची शस्त्रक्रिया जटिल होती. रुग्णाचा जीव वाचवण्यासाठी डॉ. म्हस्के यांनी तातडीने तज्ज्ञांची टीम तयार केली. या मोहिमेचे नेतृत्व प्रसिद्ध ऑन्कोसर्जन डॉ. महेश पवार यांनी केले. त्यांना डॉ. चेतन म्हस्के यांनी मोलाची साथ दिली.

शस्त्रक्रियेदरम्यान (Tracheo-Esophageal Fistula) केवळ तो छिद्र (फिस्टुला) बंद करणे पुरेसे नव्हते, तर ती जागा पुन्हा उघडू नये म्हणून प्लास्टिक सर्जन डॉ. अमित मूळे यांनी ‘मसल फ्लॅप’चा (स्नायूंचा थर) वापर करून त्या भागाला अतिरिक्त मजबुती दिली. भूलतज्ज्ञ डॉ. विठ्ठल शेंडगे यांनी या गुंतागुंतीच्या प्रक्रियेत रुग्णाची प्रकृती स्थिर ठेवली. अनेक तास चाललेल्या या अथक परिश्रमानंतर, श्वासनलिका आणि अन्ननलिका यशस्वीरित्या वेगळी करून त्यांची दुरुस्ती करण्यात आली.

“सावध राहा, दुर्लक्ष करू नका!” – डॉ. चेतन म्हस्के

(Tracheo-Esophageal Fistula) या यशस्वी शस्त्रक्रियेनंतर Medical Rare Case समाधान व्यक्त करताना डॉ. चेतन म्हस्के म्हणाले, “अनेकदा आपण खोकला किंवा आवाजातील बदलाला गांभीर्याने घेत नाही. पण या रुग्णाच्या बाबतीत हेच दुर्लक्ष जीवघेणे ठरू शकले असते. आधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञान आणि अचूक टीमवर्कमुळे आम्ही एका तरुणाचे प्राण वाचवू शकलो, याचा आनंद आहे.”

नवी उमेद, नवे आयुष्य

Medical Rare Case शस्त्रक्रियेनंतर (Tracheo-Esophageal Fistula) काही दिवसांतच या तरुणाच्या प्रकृतीत कमालीची सुधारणा झाली आहे. अलीकडेच करण्यात आलेल्या सीटी स्कॅनमध्ये तो घातक ‘फिस्टुला’ पूर्णपणे बंद झाल्याचे स्पष्ट झाले आहे. आज हा तरुण कोणत्याही त्रासाशिवाय पाणी पिऊ शकतो आणि पुन्हा एकदा आनंदी आयुष्य जगत आहे.

ही लक्षणे दिसल्यास त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधा:

आठवड्यापेक्षा जास्त काळ राहणारा सततचा खोकला.

आवाजात अचानक झालेला बदल किंवा आवाज बसणे.

पाणी पिताना वारंवार ठसका लागणे किंवा गुदमरल्यासारखे होणे.

पुण्यातील डॉ. म्हस्के हॉस्पिटलमध्ये झालेली ही शस्त्रक्रिया म्हणजे वैद्यकीय क्षेत्रातील एक मैलाचा दगड ठरली असून, ‘डॉक्टर हे पृथ्वीवरील देवदूत का असतात’, याचे जिवंत उदाहरण या निमित्ताने पुणेकरांना पाहायला मिळाले आहे.

हे ही वाचा : Pune Water Supply पुणेकरांना मोठा दिलासा, ३१ मे पर्यंत पाणीकपात रद्द; महापौरांचे प्रशासनाला कडक निर्देश

शिवराज सणस हे पुणे-स्थित वरिष्ठ पत्रकार आहेत. पुण्यासह महाराष्ट्रातील राजकीय व सामाजिक घडामोडी हे त्यांच्या अभ्यासाचे विषय आहेत.