Pune Water Supply
Pune Water Supply

Pune Water Supply पुणेकरांना मोठा दिलासा, ३१ मे पर्यंत पाणीकपात रद्द; महापौरांचे प्रशासनाला कडक निर्देश

पुणे: आगामी उन्हाळ्याची तीव्रता आणि मान्सूनचे आगमन या पार्श्वभूमीवर पुणेकरांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. पुणे महानगरपालिका Pune Municipal Corporation हद्दीतील पाणीपुरवठा Pune Water Supply सुरळीत ठेवण्यासाठी आज माननीय महापौरांच्या अध्यक्षतेखाली एक विशेष आढावा बैठक पार पडली. या बैठकीत महापौरांनी नागरिकांना दिलासा देत ३१ मे पर्यंत कोणतीही पाणीकपात करू नये, असे स्पष्ट निर्देश प्रशासनाला दिले आहेत.

पुणे शहराला पाणीपुरवठा Pune Water Supply करणाऱ्या धरणांमधील सद्यस्थिती आणि आगामी पावसाळ्याचे नियोजन करण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी शहरातील जलशुद्धीकरण व्यवस्था, वितरण प्रणाली आणि संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

भारतीय हवामान विभागाने (IMD) यंदा पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता वर्तवली आहे. ही बाब लक्षात घेऊन महापौरांनी पाण्याचे अत्यंत काटेकोर आणि नियोजनबद्ध वाटप करण्याचे आदेश दिले आहेत.

धरणांमधील पाणीसाठा आणि नियोजन

पुणे शहराची तहान भागविणाऱ्या पानशेत, वरसगाव, टेमघर आणि खडकवासला या चारही धरणांमधील पाणीसाठ्याचा Pune Water Supply सविस्तर आढावा या बैठकीत घेण्यात आला. ३१ मे पर्यंत शहराला पुरेसे पाणी उपलब्ध करून देतानाच, पावसाळा लांबल्यास उद्भवणाऱ्या परिस्थितीसाठी आत्तापासूनच बॅकअप प्लॅन तयार ठेवण्याच्या सूचना महापौरांनी दिल्या आहेत.

शुद्ध आणि स्वच्छ पाणीपुरवठ्यावर भर

पावसाळ्यात जलजन्य आजारांचा धोका वाढतो. हे लक्षात घेऊन महापौरांनी पाणी गुणवत्तेबाबत Pune Water Supply कोणतीही तडजोड न करण्याचे निर्देश दिले आहेत.

प्रयोगशाळा तपासणी: पर्वती जलकेंद्र प्रयोगशाळेत दरमहा पाण्याचे नमुने तपासले जात असून, हे पाणी WHO (जागतिक आरोग्य संघटना) आणि CPHEEO च्या निकषांनुसार शुद्ध असल्याचे प्रशासनाने सांगितले.

क्लोरीनेशन: सर्व जलशुद्धीकरण केंद्रांमध्ये क्लोरीनेशन प्रक्रिया अधिक सक्षम करण्यात आली आहे.

साठा उपलब्ध: शुद्धीकरणासाठी आवश्यक असणाऱ्या PAC आणि क्लोरीन या रसायनांचा पुरेसा साठा आगाऊ उपलब्ध करून देण्यात आला आहे.

पायाभूत सुविधा आणि दुरुस्तीची कामे पूर्ण

शहरातील १७ जलशुद्धीकरण प्रकल्पांची Pune Water Supply पावसाळ्यापूर्वीची सर्व देखभाल आणि दुरुस्तीची कामे पूर्ण झाली आहेत. यामध्ये प्रामुख्याने क्लेरीफायर आणि फिल्टर बेडची स्वच्छता करण्यात आली आहे. पावसाळ्यात धरणांमधील पाणी गढूळ होण्याची शक्यता असते, अशा वेळीही नागरिकांना स्वच्छ पाणी मिळावे यासाठी विशेष ‘हाय-टेक’ गाळणी यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे.

‘समान पाणीपुरवठा’ आणि नवीन गावांचा विकास

पुणे महानगरपालिकेत Pune Municipal Corporation नव्याने समाविष्ट झालेल्या गावांमध्येही पाणीपुरवठ्याच्या Pune Water Supply पायाभूत सुविधांचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. समान पाणीपुरवठा योजनेअंतर्गत नवीन जलशुद्धीकरण केंद्रे, पंपिंग स्टेशन आणि पाण्याच्या टाक्या उभारल्या जात आहेत. यामुळे जुन्या हद्दीप्रमाणेच नवीन गावांनाही लवकरच पुरेसा पाणीपुरवठा उपलब्ध होईल, असा विश्वास बैठकीत व्यक्त करण्यात आला.

पाणीपुरवठ्यात आता ‘AI’ आणि ‘रोबोटिक’ तंत्रज्ञान

पुणे महानगरपालिकेने Pune Municipal Corporation पाणीपुरवठा Pune Water Supply व्यवस्थेत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यावर भर दिला आहे. यामध्ये खालील गोष्टींचा समावेश असेल:

१. AI आधारित लीक डिटेक्शन: पाण्याचे गळती रोखण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वापर केला जाईल.

२. रोबोटिक कॅमेरा तपासणी: जमिनीखालच्या पाईपलाईनमधील अडथळे किंवा बिघाड शोधण्यासाठी रोबोटिक कॅमेऱ्यांचा वापर होणार आहे.

३. मोबाईल अ‍ॅप नियंत्रण: संपूर्ण वितरण प्रणालीवर मोबाईल अ‍ॅपद्वारे लक्ष ठेवले जाईल, जेणेकरून तक्रारींचे निवारण त्वरित होईल.

मनुष्यबळ टंचाईवर उपाय 

पाणीपुरवठा Pune Water Supply विभागात अनेक तांत्रिक पदे रिक्त असल्याने कामावर ताण येत असल्याचे निदर्शनास आले. यावर महापौरांनी कनिष्ठ अभियंता, तांत्रिक कर्मचारी आणि मीटर रीडर यांसारख्या रिक्त पदांची भरती प्रक्रिया तातडीने राबवण्याचे आदेश दिले आहेत.

महापौरांचा संदेश:

“पुणेकरांना पुरेसे आणि स्वच्छ पाणी मिळणे Pune Water Supply हा त्यांचा हक्क आहे. प्रशासनाने ३१ मे पर्यंत पाणीकपात रद्द करून समन्वय राखावा. मान्सून काळात नागरिकांची कोणतीही गैरसोय होणार नाही, याची जबाबदारी संबंधित विभागांनी घ्यावी,” असे आवाहन महापौरांनी केले आहे.

पुणे न्यूज अपडेट्ससाठी आमच्या पोर्टलला फॉलो करा.

हे ही वाचा : Pancreatic Cancer स्वादुपिंडाच्या प्रगत कर्करोगावर ‘आयुर्वेद रसायन’ची मात्रा प्रभावी; अमेरिकेत कर्करोगावरील जागतिक परिषदेत पुण्याच्या संशोधनावर मोहोर; डॉ. योगेश बेंडाळे यांची माहिती

शिवराज सणस हे पुणे-स्थित वरिष्ठ पत्रकार आहेत. पुण्यासह महाराष्ट्रातील राजकीय व सामाजिक घडामोडी हे त्यांच्या अभ्यासाचे विषय आहेत.