Pancreatic Cancer स्वादुपिंडाच्या प्रगत कर्करोगावर ‘आयुर्वेद रसायन’ची मात्रा प्रभावी; अमेरिकेत कर्करोगावरील जागतिक परिषदेत पुण्याच्या संशोधनावर मोहोर; डॉ. योगेश बेंडाळे यांची माहिती

Dr. Yogesh Bendale

पुणे: वैद्यकीय क्षेत्रातील अत्यंत कठीण आणि आव्हानात्मक समजल्या जाणाऱ्या स्वादुपिंडाच्या (पॅनक्रिॲटिक) कर्करोगावर Pancreatic Cancer उपचार शोधण्यात पुण्याच्या संशोधकांना मोठे यश आले आहे. पुण्यातील ‘रसायू कॅन्सर क्लिनिक’ने विकसित केलेली ‘आयुर्वेद रसायना थेरपी’ Ayurveda Rasayana Therapy (ART) प्रगत अवस्थेतील कर्करोग रुग्णांसाठी Pancreatic Cancer आशेचा नवा किरण ठरली आहे. अमेरिकेतील सॅनदिएगो येथे नुकत्याच पार पडलेल्या ‘अमेरिकन असोसिएशन फॉर कॅन्सर रिसर्च’ (AACR 2026) या जागतिक स्तरावरील प्रतिष्ठित वार्षिक परिषदेत या संशोधनाचे सादरीकरण करण्यात आले. ३० हजारांहून अधिक जागतिक तज्ज्ञांच्या उपस्थितीत या थेरपीच्या प्रभावावर अधिकृत मोहोर उमटवण्यात आली आहे.

स्वादुपिंडाचा कर्करोग Pancreatic Cancer हा साधारणपणे शेवटच्या टप्प्यात निदान होणारा आजार आहे. अशा स्थितीत रसायू कॅन्सर क्लिनिकमधील डॉ. योगेश बेंडाळे Dr. Yogesh Bendale आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी १७ रुग्णांवर केलेल्या क्लिनिकल अभ्यासाचे निष्कर्ष जागतिक स्तरावर मांडले.

जागतिक व्यासपीठावर पुण्याच्या संशोधनाची मोहोर

या संशोधनाची दखल केवळ परिषदेतच घेतली गेली नाही, तर १६.६ इम्पॅक्ट फॅक्टर असलेल्या ‘कॅन्सर रिसर्च’ या जगप्रसिद्ध नियतकालिकातही हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे. या संशोधक संघात डॉ. पूनम बिरारी-गवांदे, डॉ. प्रियंका शिरोळे आणि डॉ. अविनाश कदम यांचा समावेश असून, त्यांच्या या कार्यामुळे आयुर्वेदिक कर्करोग उपचारांकडे पाहण्याचा जगाचा दृष्टिकोन बदलण्यास मोठी मदत होणार आहे.

स्वादुपिंडाच्या कर्करोगाचे आव्हान आणि मर्यादा

स्वादुपिंडाचा कर्करोग Pancreatic Cancer प्रगत अवस्थेत असल्यास शस्त्रक्रिया किंवा केमोथेरपी करणे अनेकदा अशक्य असते. अशा रुग्णांचे सरासरी आयुर्मान केवळ ३ ते ६ महिने मानले जाते. मात्र, डॉ. बेंडाळे Dr. Yogesh Bendale यांनी स्पष्ट केल्यानुसार, ज्या रुग्णांना इतर कोणतीही पारंपरिक चिकित्सा उपलब्ध नव्हती, अशा रुग्णांवर ‘रसायन थेरपी’चे Ayurveda Rasayana Therapy (ART) प्रयोग करण्यात आले.

या संशोधनाचे सर्वात मोठे यश म्हणजे, या थेरपीमुळे Ayurveda Rasayana Therapy (ART) रुग्णांचे आयुर्मान सरासरी १० ते ११ महिन्यांपर्यंत वाढल्याचे दिसून आले आहे. केवळ आयुष्य वाढले नाही, तर अत्यंत सन्मानाने आणि वेदनामुक्त जगण्याची संधी या रुग्णांना मिळाली.

संशोधनातील काही अत्यंत महत्त्वाचे निष्कर्ष

या संशोधनादरम्यान काही थक्क करणारे निष्कर्ष समोर आले आहेत. केवळ आयुर्वेदिक रसायन चिकित्सेमुळे Ayurveda Rasayana Therapy (ART) सुमारे १२ टक्के रुग्णांच्या कॅन्सरच्या गाठीचा आकार Pancreatic Cancer कमी झाल्याचे निरीक्षण नोंदवण्यात आले आहे. याशिवाय, ज्या रुग्णांना भूक न लागणे, प्रचंड अशक्तपणा किंवा पचनाच्या तक्रारी होत्या,

त्यांच्या आरोग्यात लक्षणीय सुधारणा झाली. रुग्णांचा आहार वाढल्याने त्यांची शारीरिक क्षमता सुधारली आणि ते दैनंदिन कामे उत्साहाने करू शकले. प्रगत कर्करोगात जीवनमानाचा दर्जा (Quality of Life) उंचावणे ही रुग्णांसाठी मोठी दिलासादायक बाब ठरली आहे.

‘इंटिग्रेटिव्ह ऑंकोलॉजी’ ही काळाची गरज

आज जगभरात पाश्चात्य वैद्यकशास्त्र (Allopathy) आणि इतर उपचार पद्धतींचा समन्वय साधून ‘इंटिग्रेटिव्ह ऑंकोलॉजी’वर भर दिला जात आहे. डॉ. बेंडाळे Dr. Yogesh Bendale यांच्या मते, भारतामध्येही पाश्चात्य वैद्यक आणि आयुर्वेद चिकित्सक यांच्यात समन्वय साधण्याची नितांत गरज आहे.

कोणत्याही एकाच विचारसरणीचा अट्टाहास न धरता, रुग्णहित केंद्रस्थानी ठेवून विशाल दृष्टिकोनातून उपचार व्हायला हवेत. पुण्याचे हे संशोधन आधुनिक विज्ञान आणि प्राचीन आयुर्वेद यांचा सुवर्णमध्य साधणारे एक उत्तम उदाहरण ठरले आहे.

रुग्णांना सन्मानाने जगण्याची नवी संधी

“आयुर्वेद रसायन थेरपी Ayurveda Rasayana Therapy (ART) ही रुग्णांच्या शारीरिक क्षमतेत वाढ करून कर्करोगाशी लढण्याची ताकद देते,” असे डॉ. योगेश बेंडाळे Dr. Yogesh Bendale यांनी नमूद केले. प्रगत स्वादुपिंडाच्या कर्करोगात Pancreatic Cancer जिथे उपचारांच्या सर्व मर्यादा संपतात, तिथे ही पद्धत रुग्णांना केवळ आयुष्यच नाही तर जगण्याचा उत्साहही देते. पुण्यातील या संशोधनामुळे आता जागतिक स्तरावर कॅन्सर उपचारांच्या पद्धतींमध्ये आयुर्वेदाचे महत्त्व अधोरेखित झाले असून, आगामी काळात ही थेरपी हजारो रुग्णांसाठी जीवनदायी ठरू शकते.

पुढील पाऊल: हे संशोधन भविष्यात स्वादुपिंडाच्या कर्करोगावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांसाठी आणि रुग्णांसाठी एक मार्गदर्शक ठरणार आहे. या संशोधनामुळे भारतीय आयुर्वेद शास्त्राची मान जागतिक पटलावर पुन्हा एकदा उंचावली आहे.

हे ही वाचा : Pune Municipal Corporation पुण्याच्या विकासाचा ‘मास्टर प्लॅन’! राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी घेतला महापालिकेच्या प्रकल्पांचा धडाकेबाज आढावा; नदी पुनरुज्जीवन, २३ गावांच्या सुविधा आणि पावसाळ्यापूर्वीची तयारी ‘मिशन मोड’वर करण्याचे निर्देश; पुणेकरांना मिळणार दर्जेदार नागरी सुविधा.

शिवराज सणस हे पुणे-स्थित वरिष्ठ पत्रकार आहेत. पुण्यासह महाराष्ट्रातील राजकीय व सामाजिक घडामोडी हे त्यांच्या अभ्यासाचे विषय आहेत.
Exit mobile version