पुणे : गरीब, मजूर, झोपडपट्टी वस्तीतील नागरिकांसाठी रुग्ण हक्क परिषदच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या ‘पृथ्वी मोबाईल क्लिनिक’ Prithvi Mobile Clinic उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. अवघ्या ५ रुपयांत तपासणी व औषधोपचार देणाऱ्या या फिरत्या दवाखान्याने आतापर्यंत १०,०७७ रुग्णांना लाभ दिला असून बुधवारी १११ वे शिबिर पार पडले.
Prithvi Mobile Clinic उपक्रमाची ठळक वैशिष्ट्ये
पुण्यातील ६० ठिकाणी नियमित आरोग्य सेवा
प्रत्येक वस्तीत महिन्यातून एकदा तपासणी
दोन डॉक्टर, दोन नर्स, समन्वयक व मदतनीस अशी टीम
एमआरआय, सिटी स्कॅनसारख्या तपासण्या मोफत
गंभीर रुग्णांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मदत
उपक्रमाचे संस्थापक उमेश चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत माहिती देताना सांगितले की, “मोबाईल क्लिनिकच्या Prithvi Mobile Clinic माध्यमातून थेट वस्तीभागात जाऊन सेवा देत आहोत. प्राथमिक टप्प्यात तपासणी झाल्यास मोठे आजार टाळता येतात.”
२५ लाखांचा ‘व्हॅनिटी’ दवाखाना
शहराध्यक्षा अपर्णा साठ्ये-मारणे यांनी सांगितले की, सुमारे २५ लाख रुपयांच्या खर्चातून अद्ययावत व्हॅनिटी क्लिनिक उभारण्यात आले आहे. यासाठी जनता सहकारी बँकेचे कर्ज घेऊन टाटा विंगर वाहन खरेदी करण्यात आले. रोजचा खर्च सुमारे १२ हजार, तर महिन्याला ३.६० लाख रुपये असून हा खर्च स्वतः उमेश चव्हाण उचलत आहेत.
इन्फोबॉक्स: बाबा आढावांची प्रेरणा
कष्टकऱ्यांचे नेते दिवंगत डॉ. बाबा आढाव यांनी सुरू केलेल्या १० रुपयांच्या झुणका-भाकर केंद्रापासून प्रेरणा घेत, गरजूंना दर्जेदार आरोग्यसेवा फक्त ५ रुपयांत देण्याचा निर्णय घेण्यात आला.
Prithvi Mobile Clinic ‘ग्रँड पृथ्वी मेडिकल फाउंडेशन’च्या माध्यमातून हा उपक्रम राबवला जात आहे.
कोट
“पैशाअभावी कोणाचंही उपचाराअभावी नुकसान होऊ नये. ही केवळ सेवा नाही, तर आरोग्य जनजागृतीची चळवळ आहे.”
— उमेश चव्हाण, संस्थापक, रुग्ण हक्क परिषद
गरजूंना दिलासा देणाऱ्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असून, सामाजिक आरोग्य चळवळीचा नवा आदर्श म्हणून ‘पृथ्वी मोबाईल क्लिनिक’कडे Prithvi Mobile Clinic पाहिले जात आहे.
1 Comment