पुणे: Builders Association of India बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया देशाच्या झपाट्याने होत असलेल्या पायाभूत विकासामध्ये स्थापत्य अभियंते, वास्तुविशारद आणि बांधकाम व्यावसायिकांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे असून आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार हा काळाची गरज आहे, असे प्रतिपादन गुन्हे अन्वेषण विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. राजेंद्र डहाळे Dr. Rajendra Dahale यांनी केले. कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय), डिजिटल मॉडेलिंग आणि आधुनिक बांधकाम तंत्रज्ञान यांचा प्रभावी वापर केल्यास दर्जा, सुरक्षितता आणि गती या तिन्ही बाबींमध्ये मोठी झेप घेता येईल, असे ते म्हणाले.
Builders Association of India पुणे सेंटरतर्फे आयोजित आणि B. G. Shirke Construction Technology Pvt. Ltd. प्रायोजित २९व्या ‘बीएआय-शिर्के वेल बिल्ट स्ट्रक्चर कॉम्पिटिशन २०२५’ पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते.
हॉटेल शेरेटॉन ग्रँड येथे झालेल्या या कार्यक्रमास बांधकाम क्षेत्रातील नामवंत मान्यवरांची उपस्थिती होती.
‘निर्माणरत्न २०२५’ जीवनगौरव रोहिदास मोरे यांना
यंदाचा Builders Association of India ‘बीएआय-पद्मश्री बी. जी. शिर्के जीवनगौरव पुरस्कार’ (निर्माणरत्न २०२५) युनिव्हर्सल ग्रुपचे संस्थापक रोहिदास उर्फ दादासाहेब मोरे यांना प्रदान करण्यात आला. पुणेरी पगडी, शाल, सन्मानचिन्ह, मानपत्र आणि एक लाख अकरा हजार रुपयांची रोख रक्कम असे पुरस्काराचे स्वरूप होते. मोरे यांनी पुरस्काराची संपूर्ण रक्कम कामगारांच्या मुलांच्या शैक्षणिक मदतीसाठी बीएआयकडे सुपूर्द करून सामाजिक बांधिलकीचे उदाहरण घालून दिले.
सत्काराला उत्तर देताना मोरे म्हणाले की, देशात सुरू असलेल्या मेट्रो प्रकल्पांपासून समृद्धी महामार्ग आणि अटल सेतू यांसारख्या भव्य पायाभूत प्रकल्पांमुळे विकासाला नवी चालना मिळत आहे. अशा वेळी स्वदेशी तंत्रज्ञानावर आधारित ‘इम्पोर्ट सबस्टिट्यूशन’ला प्राधान्य देणे आवश्यक आहे. गुणवत्ता आणि वेळेचे भान राखून काम पूर्ण करण्यातच खरा समाधान असतो, असे ते म्हणाले.
स्पर्धेतून गुणवत्तेला प्रोत्साहन
डॉ. डहाळेDr. Rajendra Dahale यांनी स्पर्धेतील विजेत्यांनी उभारलेल्या निवासी संकुल, पूल, औद्योगिक इमारती आणि व्यावसायिक प्रकल्पांच्या गुणवत्तेचे कौतुक केले. १९८९-९२ दरम्यान सिडकोमधील सेवाकाळाच्या आठवणी सांगत त्यांनी बांधकाम क्षेत्रातील सातत्यपूर्ण प्रगती अधोरेखित केली. सध्या देशभर महामार्ग, विमानतळे आणि औद्योगिक कॉरिडॉर उभे राहत असून तरुण अभियंत्यांसाठी ही मोठी संधी असल्याचे त्यांनी नमूद केले.
बीएआय Builders Association of India पुणे सेंटरचे अध्यक्ष अजय गुजर यांनी प्रास्ताविकात स्पर्धेच्या आयोजनामागील भूमिका स्पष्ट केली. बांधकाम क्षेत्रात गुणवत्तेचे नवे मापदंड प्रस्थापित करणाऱ्या संस्थांना प्रोत्साहन देणे हा या उपक्रमाचा उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले. ‘वेल बिल्ट स्ट्रक्चर’ स्पर्धा गेल्या २९ वर्षांपासून सातत्याने आयोजित केली जात असून निवासी, व्यावसायिक, औद्योगिक, पायाभूत सुविधा, सरकारी प्रकल्प अशा एकूण १६ श्रेणींमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्यांचा गौरव केला जातो, अशी माहिती स्पर्धा अध्यक्ष सुनील मते यांनी दिली.
विविध श्रेणीतील विजेते
यंदाच्या स्पर्धेत निवासी श्रेणीत शिवालय कन्स्ट्रक्शन, श्री ओम कन्स्ट्रक्शन, कामाक्षी कन्स्ट्रक्शन्स, निर्माण डेव्हलपर्स आणि प्राईड बिल्डर्स एलएलपी यांना सन्मानित करण्यात आले. कमर्शियल श्रेणीत तेजस इन्फ्रा टेक, भाटे अँड राजे कन्स्ट्रक्शन्स प्रा. लि. आणि कंग्राळकर इन्फ्रास्ट्रक्चर यांनी बाजी मारली. औद्योगिक प्रकल्पांमध्ये स्कॉन प्रोजेक्ट्स आणि रतिलाल भगवानदास, तर पायाभूत सुविधा उभारणीत टी अँड टी इन्फ्रा लिमिटेड आणि सुमेधा इंफ्राप्रोजेक्ट्स प्रा. लिमिटेड यांचा गौरव झाला.
सरकारी प्रकल्प उभारणीत वेस्कॉन इंजिनिअर्स लिमिटेड, एस. एस. साठे इन्फ्रा प्रा. लिमिटेड आणि ए. पी. असोसिएट्स यांना पुरस्कार देण्यात आले. वर्क अप टू बेअर शेल श्रेणीत मिलेनियम इंजिनियर्स अँड काँट्रॅक्टर्स लिमिटेड, तर लँडस्केप श्रेणीत सुगम कन्स्ट्रक्शन्स आणि डिझाईन बिल्डिंग वर्कशॉप पुणे यांना सन्मानित करण्यात आले. गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव नोंदवल्याबद्दल राजपथ इन्फ्राचा विशेष गौरव करण्यात आला.
प्रेरणादायी उपक्रम
कार्यक्रमात बीएआयचे Builders Association of India माजी अध्यक्ष आर. राधाकृष्णन यांनी पुणे सेंटरच्या कार्याचे कौतुक करत अशा स्पर्धा बांधकाम क्षेत्रातील नवकल्पनांना चालना देतात, असे मत व्यक्त केले. विविध मान्यवरांच्या उपस्थितीत झालेला हा सोहळा बांधकाम क्षेत्रातील गुणवत्तापूर्ण कार्याला नवी प्रेरणा देणारा ठरला. राष्ट्रउभारणीत मोलाची भूमिका बजावणाऱ्या अभियंत्यांच्या कार्याचा सन्मान करण्याची ही परंपरा पुढील काळात अधिक भक्कम होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
हे ही वाचा : Prithvi Mobile Clinic गरजूंसाठी दिलासा; ‘पृथ्वी मोबाईल क्लिनिक’कडून अवघ्या ५ रुपयांत उपचार
1 Comment