पुणे : राज्यातील महापालिका निवडणुका महाविकास आघाडीसोबत न लढवण्याचा निर्णय आम आदमी पक्षाने (आप – Aam Aadmi Party) घेतला आहे. पुण्यासह राज्यातील विविध महापालिकांत ‘आप’ स्वतंत्रपणे निवडणूक लढवणार असून पुणे महापालिकेच्या १०० हून अधिक जागांवर उमेदवार उभे करण्याची तयारी पक्षाने केली आहे.
महाविकास आघाडीतील घटक पक्षांमध्ये सध्या पुणे महापालिकेच्या जागावाटपावर चर्चा सुरू आहे. या चर्चांमध्ये ‘आप’साठी काही जागा सोडण्याचे संकेत देण्यात आले होते. मात्र, या पार्श्वभूमीवर ‘आप’ने महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याची भूमिका स्पष्ट केली आहे.
Aam Aadmi Party: भूमिका स्पष्ट नसल्यामुळे महापालिका निवडणुका एकत्र न लढवण्याचा निर्णय
घराणेशाही, भ्रष्टाचार आणि गुंडगिरी यासारख्या मुद्द्यांवर महाविकास आघाडीतील नेत्यांची भूमिका स्पष्ट नसल्यामुळे महापालिका निवडणुका एकत्र न लढवण्याचा निर्णय घेतल्याचे ‘आप’चे (Aam Aadmi Party) प्रदेश प्रवक्ते मुकुंद किर्दत यांनी सांगितले.
महाविकास आघाडीच्या जागावाटप प्रक्रियेला विलंब होत असून ‘आप’ने (Aam Aadmi Party) आतापर्यंत पुण्यात ४१ उमेदवारांची घोषणा केली आहे. तसेच मुंबईत १५, पिंपरी-चिंचवडमध्ये १५ आणि कोल्हापूरमध्ये १५ उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत.
नाशिक महापालिकेसाठीही लवकरच उमेदवारांची घोषणा करण्यात येणार असून पुण्यात १०० पेक्षा अधिक जागांवर निवडणूक लढवण्याची पूर्ण तयारी असल्याचे किर्दत यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, ‘आप’चे (Aam Aadmi Party) राष्ट्रीय अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांच्या मुंबई व पुण्यात जाहीर सभा होण्याची शक्यता असून संजय सिंह, राघव चढ्ढा यांच्यासह पक्षाचे अन्य वरिष्ठ नेते महाराष्ट्रात प्रचारासाठी येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.
हेही वाचाः Prakash Mahajan: राज ठाकरेंचे विश्वासू मानले जाणारे प्रकाश महाजन शिंदे शिवसेनेत दाखल
1 Comment