मुंबई/नवी मुंबई – Ganesh Naik vs Eknath Shinde राज्यातील राजकीय वातावरण तापले असतानाच मंत्री गणेश नाईक यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात केलेल्या “नामोनिशान मिटवून टाकू” या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे. काल एका सार्वजनिक कार्यक्रमात बोलताना गणेश नाईक यांनी शिंदे साहेबांवर अत्यंत आक्रमक शब्दांत टीका केली. या वक्तव्यानंतर सत्ताधारी व विरोधक अशा दोन्ही बाजूंनी तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या असून, राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे.
मंत्री गणेश नाईक यांच्या या वक्तव्यावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करत शिवसेनेचे पुणे महानगर प्रमुख रविंद्र धंगेकर यांनी आपल्या फेसबुक पोस्टद्वारे जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
“राजकारणात कोणी कोणाचं नामोनिशान मिटवू शकत नाही. आपण सगळे जनतेचे सेवक आहोत. लोकांनी संधी दिल्यामुळेच आपण आज या पदांवर आहोत,” असे स्पष्ट शब्दांत धंगेकर यांनी प्र्यत्युत्तर दिले आहे. मात्र Ganesh Naik vs Eknath Shinde गणेश नाईकांना या वास्तवाचा विसर पडलेला दिसतो, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.
धंगेकर पुढे म्हणतात की, “एकनाथ शिंदे यांनी स्वतःचे राजकीय साम्राज्य स्वतःच्या कर्तृत्वावर उभे केले आहे. त्यांचा जनाधार हा संघर्षातून निर्माण झालेला आहे. याउलट गणेश नाईक हे भाजपच्या दारात चाकरी करत असून, नवी मुंबईची सुभेदारकी त्यांना बहाल करण्यात आलेली आहे.” Ganesh Naik vs Eknath Shinde या शब्दांतून त्यांनी गणेश नाईकांच्या राजकीय अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
इतक्यावरच न थांबता धंगेकर यांनी आपल्या पोस्टमध्ये आणखी टोला लगावला आहे. Ganesh Naik vs Eknath Shinde“ज्याचं स्वतःचं साम्राज्य असतं, त्यांचं नामोनिशान मिटवण्याची स्वप्न गणेश नाईकांनी पाहू नयेत. आणि जर त्यांच्यात एवढीच नामोनिशान मिटवण्याची खुमखुमी असेल, तर भाजपने त्यांना परराष्ट्रमंत्री करावं. आपल्या देशाकडे पाकिस्तानसारखे अनेक शत्रू देश आहेत; तिथे तरी यांचा उपयोग होईल,” असे उपरोधिक विधान करत त्यांनी सोशल मीडियावर चर्चेचा भडका उडवला आहे.
दरम्यान, गणेश नाईक यांच्या कालच्या वक्तव्यावरून राज्यातील राजकीय तापमान आणखी चढताना दिसत आहे. एकनाथ शिंदे यांच्याविरोधात केलेल्या आक्रमक भाषेचा सत्ताधारी पक्षाला फायदा होणार की उलट परिणाम भोगावा लागणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. नाईकांच्या वक्तव्यामागील राजकीय हेतू काय, हा प्रश्नही उपस्थित होत असून, येत्या काळात हा वाद अधिक तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत.
राजकारणातील शब्दयुद्ध अधिक धारदार होत असताना, जनतेच्या प्रश्नांपेक्षा वैयक्तिक टीका आणि आरोप-प्रत्यारोपांनाच अधिक महत्त्व दिले जात असल्याची भावना नागरिकांतून व्यक्त होत आहे. आता या वादावर गणेश नाईक किंवा एकनाथ शिंदे यांची अधिकृत प्रतिक्रिया काय येते, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
Leave a Reply