नवी दिल्ली – देशाचा ७७ वा प्रजासत्ताक दिन Republic Day Parade 2026 आज राजधानी दिल्लीतल्या कर्तव्यपथावर अत्यंत उत्साहात, शिस्तबद्ध पद्धतीने आणि दिमाखात साजरा करण्यात आला. भारतीय लोकशाहीची ताकद, सशस्त्र दलांचे सामर्थ्य, विविधतेतील एकता आणि विज्ञान-तंत्रज्ञानातील प्रगती यांचे भव्य दर्शन या राष्ट्रीय सोहळ्यात घडले.
या संचलनात Republic Day Parade 2026 महाराष्ट्र राज्याच्या ‘गणेशोत्सव : आत्मनिर्भरतेचे प्रतीक’ या विषयावरील चित्ररथाने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.
प्रजासत्ताक दिन सोहळ्याच्या प्रारंभी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय युद्ध स्मारक येथे जाऊन शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण केली.
त्यानंतर मुख्य संचलन सुरू होण्यापूर्वी राष्ट्रपतींच्या हस्ते भारतीय हवाई दलाचे अधिकारी ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला यांना अशोक चक्र प्रदान करून सन्मानित करण्यात आले. या गौरवपूर्ण क्षणानंतर कर्तव्यपथावर भव्य संचलनाला Republic Day Parade 2026 सुरुवात झाली.
या संचलनात भारतीय लष्कर, नौदल आणि हवाई दलाच्या तुकड्यांनी शिस्त, शौर्य आणि आधुनिक लष्करी सामर्थ्याचे प्रभावी प्रदर्शन केले. देशातील विविध राज्यांच्या चित्ररथांमधून भारताची सांस्कृतिक विविधता आणि एकात्मतेचे दर्शन घडले.
या सर्व चित्ररथांमध्ये महाराष्ट्राचा चित्ररथ संकल्पनेतील सामाजिक आशय आणि सादरीकरणाच्या प्रभावामुळे विशेष ठरला. महाराष्ट्राच्या चित्ररथाची संकल्पना ‘गणेशोत्सव : आत्मनिर्भरतेचे प्रतीक’ अशी होती.
लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी सुरू केलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवातून सामाजिक एकात्मता, लोकसहभाग आणि राष्ट्रीय चेतना कशी निर्माण झाली, हे या चित्ररथातून Maharashtra Culture Republic Day प्रभावीपणे मांडण्यात आले. ब्रिटिश राजवटीत जनजागृतीचे साधन ठरलेला गणेशोत्सव आज आधुनिक भारतात आत्मनिर्भरतेचा मजबूत आधार कसा बनला आहे, याचे सशक्त चित्रण या सादरीकरणात करण्यात आले.
गणेशोत्सवाच्या माध्यमातून निर्माण होणारी स्थानिक अर्थव्यवस्था हा या चित्ररथाचा मुख्य केंद्रबिंदू ठरला. मूर्तिकार, रंगकाम करणारे कलाकार, सजावट करणारे व्यावसायिक, प्रकाश व ध्वनिव्यवस्था तज्ज्ञ, वादक, वाहतूक व्यवस्था तसेच लघु व मध्यम व्यापारी यांना गणेशोत्सवातून मिळणारा शाश्वत रोजगार या चित्ररथातून अधोरेखित करण्यात आला.
या संपूर्ण आर्थिक साखळीमुळे गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव नसून तो रोजगारनिर्मितीचा आणि स्वावलंबनाचा मोठा स्रोत असल्याचा संदेश देण्यात आला.चित्ररथाची कलात्मक रचना, रंगसंगती आणि प्रकाशयोजना अत्यंत आकर्षक होती. पारंपरिक कला आणि आधुनिक सादरीकरण यांचा सुरेख संगम या चित्ररथात दिसून आला.
गणेशमूर्ती, देखाव्याची रचना आणि सजीव सादरीकरणामुळे चित्ररथ Maharashtra Culture Republic Day अधिक जिवंत वाटत होता. कर्तव्यपथावर उपस्थित असलेल्या नागरिकांनी, देश-विदेशातील पाहुण्यांनी तसेच विद्यार्थ्यांनी महाराष्ट्राच्या चित्ररथाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. टाळ्यांचा कडकडाट आणि जयघोषामुळे परिसर दुमदुमून गेला.
प्रजासत्ताक दिन संचलनानंतर महाराष्ट्राच्या चित्ररथाचे छायाचित्रे आणि दृकश्राव्य चित्रफिती Maharashtra Culture Republic Day समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणावर प्रसारित होत आहेत. अनेक नागरिकांनी या चित्ररथाचे कौतुक करताना सामाजिक बांधिलकी, सांस्कृतिक जाणीव आणि आर्थिक स्वावलंबन यांचा संदेश प्रभावीपणे पोहोचल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली
आहे.एकूणच प्रजासत्ताक दिन २०२६ च्या संचलनात महाराष्ट्राचा ‘गणेशोत्सव : आत्मनिर्भरतेचे प्रतीक’ हा चित्ररथ केवळ सांस्कृतिक सादरीकरण न राहता, भारतीय समाजाच्या आत्मनिर्भरतेचे, लोकसहभागाचे आणि सांस्कृतिक वैभवाचे प्रभावी प्रतीक ठरला. कर्तव्यपथावर महाराष्ट्राने सादर केलेला हा चित्ररथ प्रेक्षकांच्या मनात दीर्घकाळ घर करून राहील, असे मत व्यक्त करण्यात येत आहे.
Leave a Reply