पुणे: पुण्याचे ज्येष्ठ व नामवंत आयुर्वेदाचार्य डॉ. हरीश पाटणकर यांना बंगळुरू येथे पार पडलेल्या दुसऱ्या जागतिक आयुर्वेद आरोग्य परिषदेत प्रतिष्ठेचा ‘आंतरराष्ट्रीय आयुर्वेद रत्न पुरस्कार’ (International Ayurveda Ratna Award) देऊन गौरविण्यात आले. प्रसिद्ध कन्नड अभिनेते व रंगभूमी दिग्दर्शक प्रकाश बेलवाडी यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
आयुर्वेदीय उपचार, संशोधन आणि अध्यापन क्षेत्रात अनेक दशकांपासून दिलेल्या उल्लेखनीय योगदानाबद्दल तसेच शुद्ध आणि पारंपरिक आयुर्वेदाचा राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसार करण्यासाठी केलेल्या कार्याची दखल घेऊन डॉ. पाटणकर यांना हा सन्मान (International Ayurveda Ratna Award) देण्यात आला.
केंद्रीय आयुष मंत्रालय व कर्नाटक राज्य आयुष विभागाच्या सहकार्याने प्रशांती आयुर्वेद सेंटरतर्फे या जागतिक आयुर्वेद आरोग्य परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. आयुर्वेदाचा जागतिक स्तरावर प्रचार, पारंपरिक आयुर्वेदीय ज्ञान आणि आधुनिक आरोग्य व्यवस्थेमधील संवाद अधिक बळकट करणे हा या परिषदेचा मुख्य उद्देश होता.
International Ayurveda Ratna Award: भारतीय पारंपरिक ज्ञान प्रणालीचे जागतिक महत्त्व
परिषदेत देश-विदेशातील आठ हजारांहून अधिक आयुर्वेद तज्ज्ञ, संशोधक, प्राध्यापक, विद्यार्थी, धोरणकर्ते आणि आरोग्य क्षेत्रातील व्यावसायिक सहभागी झाले होते.
परिषदेदरम्यान वैज्ञानिक सत्रे, परिसंवाद, मुख्य भाषणे आणि संशोधन सादरीकरणांचे आयोजन करण्यात आले. पुराव्यावर आधारित आयुर्वेद, समन्वित वैद्यकीय पद्धती, प्रतिबंधात्मक आरोग्यसेवा तसेच भारतीय पारंपरिक ज्ञान प्रणालीचे जागतिक महत्त्व या विषयांवर तज्ज्ञांनी सखोल मंथन केले.
यावेळी डॉ. पाटणकर यांनी ‘आधुनिक वैद्यकीय व्यवहारात पारंपरिक आयुर्वेदीय तत्त्वांचा प्रभावी वापर’ या विषयावर अभ्यासपूर्ण व्याख्यान दिले. मिळालेला सन्मान त्यांनी गुरु डॉ. समीर जमदाग्नी, डॉ. गोपाकुमार आणि सद्गुरू श्री आनंदनाथ महाराज यांना अर्पण केला.
हेही वाचाः Jalmitra Puraskar: पाणी आणि शेतीशिवाय मानवजातीचे अस्तित्व शक्य नाही : डॉ. सुरेश प्रभू
2 Comments