Riverfront Development Pune पुणे शहराला नवा श्वास – मुळा-मुठा नदीकाठ प्रकल्पाचा  पहिला टप्पा १५ फेब्रुवारीला होणार नागरिकांसाठी खुला

पुणे : पुणे महापालिकेच्या PMC महत्त्वाकांक्षी मुळा-मुठा नदीकाठसुधार प्रकल्पाचा Riverfront Development Pune संगमवाडी ते बंडगार्डन दरम्यानचा नववा टप्पा आता अंतिम टप्प्यात पोहोचला असून, यातील पथदर्शी दीड किलोमीटरचे  काम १५ फेब्रुवारीला नागरिकांसाठी खुले  करण्यात येणार आहे.

नदीकाठावर फेरफटका, विरंगुळा आणि निसर्गसौंदर्य अनुभवण्याची संधी पुणेकरांना मिळणार असल्याने या उद्घाटनाबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.


महापालिकेने PMC संगमवाडी येथील नदीवरील पुलापासून बंडगार्डन येथील गणेश घाटापर्यंत सुमारे ३.७ किलोमीटर अंतराचा हा नववा टप्पा Riverfront Development Pune विकसित केला असून, उर्वरित काम ३१ मार्च २०२६ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे.

सहा मार्च २०२२ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमीपूजन झालेल्या या प्रकल्पांतर्गत शहरातील मुळा, मुठा आणि मुळा-मुठा नदीच्या दोन्ही बाजूंनी ४४ किलोमीटरचा नदीकाठ Riverfront Development Pune विकसित केला जाणार आहे.


महापालिकेचे शहर अभियंता प्रशांत वाघमारे यांनी शनिवारी संगमवाडी येथील नदीकाठसुधार प्रकल्पाच्या Riverfront Development Pune कामाची पाहणी केली. यावेळी कार्यकारी अभियंता बिपीन शिंदे, महापालिकेचे अधिकारी होते. कामाची गुणवत्ता, सुरक्षितता आणि नागरिकांसाठी उपलब्ध होणाऱ्या सुविधांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.


जॉगिंग ट्रॅक, बसण्यासाठी पायऱ्या आणि हिरवाईने सजलेला नदीकाठ
बंडगार्डन येथील गणेश विसर्जन घाटापासून कामाची सुरुवात करण्यात आली होती. येथील सुमारे दीड किलोमीटरचा भाग पूर्ण झाला असून, या परिसरात नागरिकांसाठी जॉगिंग ट्रॅक, नदीकाठावर बसण्यासाठी आकर्षक पायऱ्या आणि मोकळी जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे.


त्याच धर्तीवर संगमवाडी येथे सीओईपी बोट क्लबच्या विरुद्ध बाजूस, पाटील इस्टेट वसाहतीजवळही सुविधा उभारण्यात आल्या आहेत.


दोन हजार नागरिक एकाच वेळी बसू शकतील अशा पायऱ्या
मुळा-मुठा संगम परिसरात विशेष रचनेच्या उतरत्या पायऱ्या तयार करण्यात आल्या असून, यासाठी उष्णतेने गरम न होणाऱ्या खास दगडाचा वापर करण्यात आला आहे. या पायऱ्यांवर एकाच वेळी सुमारे दोन हजार नागरिक बसू शकतील, असा दावा महापालिकेने केला आहे.

परिसरात देशी वृक्षांची लागवड, तसेच आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली असून, संध्याकाळच्या वेळेस हा भाग विशेष खुलून दिसणार आहे.


नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी वाहतूक उपायांची मागणी
दरम्यान, मुख्य संगमवाडी रस्त्यावर गतिरोधक बसविण्यात यावेत, जेणेकरून वाहनांचा वेग कमी होईल आणि नागरिकांना सुरक्षितपणे रस्ता ओलांडता येईल, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे. याकडे महापालिकेने सकारात्मक दृष्टीने पाहावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

हे ही वाचा :- http://PMC NEWS अपघाती निधन झालेल्या कंत्राटी कर्मचाऱ्याच्या वारसास १० लक्ष विम्याची रक्कम प्राप्त

शिवराज सणस हे पुणे-स्थित वरिष्ठ पत्रकार आहेत. पुण्यासह महाराष्ट्रातील राजकीय व सामाजिक घडामोडी हे त्यांच्या अभ्यासाचे विषय आहेत.
Exit mobile version