Woman Entrepreneur Pune संकटातून उभा राहिलेला उद्योजकतेचा प्रवास; कोविड सेंटरसाठी मनुष्यबळ उभे करणाऱ्या भाग्यश्री ठाकूर आज हजारोंना देतात रोजगार

Bhaghyashree Thakur

पुणे : Woman Entrepreneur Pune कोरोनाच्या भीषण काळात संपूर्ण जग थांबले होते. भीतीचे वातावरण असताना रुग्णसेवेसाठी मनुष्यबळ उभे करणे हे मोठे आव्हान होते. मात्र त्या काळात उद्योजिका भाग्यश्री ठाकूर Bhaghyashree Thakur यांनी धाडसाने पुढे येत ससून रुग्णालयातील कोविड सेंटरसाठी मनुष्यबळ उपलब्ध करून देत महत्त्वाची भूमिका बजावली. आज त्या ‘करिअरझोन एलएलपी’च्या माध्यमातून हजारो तरुणांना रोजगार उपलब्ध करून देत आहेत.

Woman Entrepreneur Pune आज त्यांनी एक यशस्वी उद्योजिका म्हणून ओळख निर्माण केली आहे. 

कोरोना महामारीच्याCovid-19 Pandemic सुरुवातीला शासनाने ससून रुग्णालयातील नव्याने बांधलेली ११ मजली इमारत समर्पित कोविड सेंटर म्हणून घोषित केली. त्या वेळी रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत होती. रुग्णांची सेवा करण्यासाठी डॉक्टर, परिचारिका आणि स्वच्छता कर्मचारी मिळून जवळपास १३०० अतिरिक्त मनुष्यबळाची गरज होती. मात्र भीतीचे वातावरण असल्यामुळे अनेक मनुष्यबळ पुरवठादारांनी या कामाकडे पाठ फिरवली होती.

अशा परिस्थितीत भाग्यश्री ठाकूर Bhaghyashree Thakur यांनी हे आव्हान स्वीकारले. त्यांना यापूर्वी शासकीय कंत्राटाचा कोणताही अनुभव नव्हता. तरीही प्रचंड इच्छाशक्तीच्या जोरावर त्यांनी ससून रुग्णालयासाठी मनुष्यबळ पुरवठ्याचे कंत्राट घेतले. सुरुवातीला जाहिराती देऊनही कोणी कामासाठी पुढे येत नव्हते. अखेर दुप्पट पगार, तसेच राहणे आणि जेवणाची सोय अशा सुविधा जाहीर केल्यानंतर काही जण कामासाठी तयार झाले.

कामावर रुजू झाल्यानंतरही अनेकांमध्ये भीती होती. काही जण काम सोडून जात होते. अशा वेळी ठाकूर Bhaghyashree Thakur यांनी कर्मचाऱ्यांमध्ये सेवा भावनेची प्रेरणा जागवली. स्वतः कोविड रुग्णांच्या वॉर्डमध्ये जाऊन कर्मचाऱ्यांना धीर दिला. त्यांच्या या प्रयत्नांमुळे परिचारिका व स्वच्छता कर्मचाऱ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण झाला आणि अखेर कोविड रुग्णांच्या सेवेसाठी मोठी टीम तयार झाली. या माध्यमातून ससून रुग्णालयात गंभीर अवस्थेतील सुमारे सहा हजार रुग्णांची सेवा करण्यात आली.

“तो काळ Covid-19 Pandemic खरोखरच खूप आव्हानात्मक होता. शासकीय कंत्राटासाठी आवश्यक असलेली अनामत रक्कमही आमच्याकडे नव्हती. कोणताही अनुभव नसताना इतरांकडून पैसे उभे करून या क्षेत्रात उतरलो. त्या अनुभवातून खूप काही शिकायला मिळाले आणि त्याच बळावर पुढचा प्रवास शक्य झाला,” असे भाग्यश्री ठाकूर यांनी सांगितले.

आज त्या ‘करिअरझोन एलएलपी’च्या माध्यमातून हजारो तरुणांना रोजगार उपलब्ध करून देत आहेत. ससूननंतर महावितरणसह विविध शासकीय आणि खासगी संस्थांमध्ये त्यांच्या कंपनीमार्फत मनुष्यबळ पुरवले जात आहे. त्याचबरोबर ‘उडान फाउंडेशन’च्या माध्यमातून त्या वृद्धाश्रमही चालवत असून निराधार ज्येष्ठांची स्वखर्चाने काळजी घेत आहेत.

जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर आव्हानांवर मात करत रोजगारनिर्मिती करणाऱ्या भाग्यश्री ठाकूर यांचा प्रवास अनेक महिलांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

हे ही वाचा : Yashwantrao Chavan award Pune पुण्यात ४० वे कवी संमेलन आणि यशवंतराव चव्हाण कला-साहित्य पुरस्कार सोहळा; अभिनेते महेश कोठारे यांना ‘कला जीवनगौरव’, रानमाणूस प्रसाद गावडे यांना ‘अजितदादा सामाजिक कार्य पुरस्कार’

Exit mobile version