पुणे : पुणे शहरातील रस्ते, पादचारी मार्ग, स्वच्छता, देखभाल-दुरुस्ती आणि विविध शासकीय विभागांमधील समन्वय यांवर भर देत २०२६ या वर्षात शहराचा सर्वांगीण कायापालट घडवण्याचा महत्त्वाकांक्षी निर्धार ( Pune Municipal Corporation ) पुणे महापालिकेने केला आहे. यासाठी महापालिकेतर्फे ‘शहर परिवर्तन कक्षा’ स्थापन करण्यात आली असून, या कक्षाची पहिली बैठक आज पुणे महानगरपालिकेत तब्बल तीन तास पार पडली.
( Pune Municipal Corporation ) २०२६ अखेरीस दिसणार ठळक बदल शहर परिवर्तन कक्षाद्वारे पुण्याचा कायापालट
या बैठकीत महापालिका आयुक्त नवल किशोर राम, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, शहर अभियंता अनिरुद्ध पावसकर यांच्यासह महापालिका, एमएसडीसीएल, पोलिस विभाग, बीएसएनएल आदी विविध शासकीय विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. शहरातील लहान-मोठ्या समस्या तातडीने सोडवणे, खोदकाम थांबवणे, रस्ते टिकाऊ ठेवणे आणि नागरिकांना दर्जेदार सुविधा देणे, या मुद्द्यांवर सखोल चर्चा झाली.
‘लहान गोष्टींमधून मोठा बदल’ – आयुक्त राम
महापालिका आयुक्त नवल किशोर राम म्हणाले, “२०२६ या नवीन वर्षात पुणे महापालिकेने ( Pune Municipal Corporation ) छोट्या-छोट्या गोष्टींमधून मोठा शहर परिवर्तन घडवण्याचा संकल्प केला आहे. दर महिन्याला ‘शहर परिवर्तन कक्षा’ची बैठक होईल. या बैठकीत महापालिकेला इतर विभागांकडून अपेक्षित असलेले सहकार्य आणि इतर विभागांना महापालिकेकडून भेडसावणाऱ्या अडचणी यावर चर्चा करून त्वरित निर्णय घेतले जातील.”
पुणे ग्रँड टूरने दाखवला समन्वयाचा आदर्श
पुणे ग्रँड टूर सायकल स्पर्धेच्या निमित्ताने सर्व शासकीय यंत्रणांनी एकत्र काम करून काय साध्य होऊ शकते, याचा उत्तम नमुना शहरात पाहायला मिळाला, असे आयुक्त राम यांनी नमूद केले. या स्पर्धेसाठी ७५ किलोमीटर लांबीचे रस्ते आणि पादचारी मार्ग दुरुस्त करण्यात आले असून, या मार्गांवर पुढील पाच वर्षे कोणतेही खोदकाम केले जाणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले.
इतकेच नव्हे, तर येत्या एका वर्षात या सायकल मार्गांच्या दुसऱ्या बाजूचे डांबरीकरण, सुशोभीकरण आणि सुरक्षिततेसाठी आवश्यक ती कामे केली जाणार आहेत. यामुळे शहराच्या सौंदर्यात वाढ होण्याबरोबरच नागरिकांच्या दैनंदिन प्रवासालाही मोठा दिलासा मिळणार आहे.
रस्ते, स्वच्छता आणि समन्वयावर विशेष लक्ष
बैठकीत ( Pune Municipal Corporation ) शहरातील रस्त्यांवरील सततच्या खोदकामामुळे निर्माण होणाऱ्या अडचणी, देखभाल-दुरुस्तीची कामे वेळेत न होणे, स्वच्छतेचा अभाव आणि विभागीय समन्वयाचा अभाव या मुद्द्यांवर विशेष भर देण्यात आला.
“शहरात हजारो कोटी रुपयांचे मोठे प्रकल्प सुरू राहतील. मात्र, त्याचबरोबर रोजच्या वापरातील छोटे प्रश्न सुटणेही तितकेच महत्त्वाचे आहे,” असे आयुक्त राम यांनी स्पष्ट केले.
पुढील सायकल स्पर्धेसाठी मोठी तयारी
जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी म्हणाले, “यंदाची (Pune Grand Tour) पुणे ग्रँड टूर सायकल स्पर्धा ४५० किलोमीटरची होती. पुढील वर्षी ती ९०० किलोमीटरची होणार आहे. त्यामुळे आणखी रस्ते दर्जेदार करण्यासाठी आजच्या बैठकीत नियोजन करण्यात आले. दर महिन्याला या कामांचा आढावा घेतला जाईल.”
समाविष्ट गावांनाही मिळणार सुविधा
( Pune Municipal Corporation ) शहरात समाविष्ट झालेल्या गावांचा विकास आराखडा अद्याप अंतिम न झाल्याने तेथील नागरिकांना मूलभूत सुविधांपासून वंचित ठेवता येणार नाही, असेही आयुक्त राम यांनी सांगितले. यासाठी पीएमआरडीएमार्फत आवश्यक विकासकामे करण्याच्या सूचना दिल्या जाणार आहेत.
२०२६ अखेरीस पुण्यात ठळक बदल
‘शहर परिवर्तन कक्षा’च्या माध्यमातून विविध विभागांमधील समन्वय वाढवून, नियमित देखभाल-दुरुस्ती, स्वच्छता आणि नागरिकाभिमुख कामांवर भर दिला जाणार आहे. २०२६ च्या अखेरीपर्यंत पुणे शहरात सकारात्मक आणि ठळक बदल दिसतील, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.
हे ही वाचा : http://Shriguruji Award दादा लाड, भारतभूषणदासजी महाराज यांना जनकल्याण समितीचा ‘पूजनीय श्रीगुरुजी पुरस्कार’
Leave a Reply