Kothrud Boiling Tea Attack: कौटुंबिक वादातून पत्नीने पतीच्या चेहऱ्यावर उकळता चहा टाकला

Kothrud boiling tea attack

पुणे: कोथरूड परिसरात कौटुंबिक वादातून पत्नीने पतीच्या चेहऱ्यावर उकळता चहा टाकल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी कोथरूड पोलीस ठाण्यात २३ वर्षीय तरुणीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे (Kothrud boiling tea attack).

याबाबत २७ वर्षीय पतीने पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित दाम्पत्याचा दोन वर्षांपूर्वी विवाह झाला.

Kothrud Boiling Tea Attack: कौटुंबिक कारणावरून वाद

पती खासगी संस्थेत सुरक्षारक्षक म्हणून काम करतो. दोघेही पौड रस्ता परिसरात वास्तव्यास आहेत. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यात कौटुंबिक कारणावरून वाद सुरू होते.

बुधवारी (३१ डिसेंबर) सकाळी पती झोपेत असताना पत्नीने त्याला उठवले. पती झोपेचे नाटक करत असल्याचा आरोप करत दोघांमध्ये वाद झाला. वादाच्या भरात पत्नीने गॅसवर उकळत ठेवलेला चहा थेट पतीच्या चेहऱ्यावर टाकला.

या घटनेत पतीच्या चेहऱ्याला भाजल्याची दुखापत झाली आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस हवालदार एम. जी. दळवी करत आहेत.

हेही वाचाः German Bakery Blast: प्रकरणातील आरोपी बंटी जहागिरदारवर श्रीरामपूरमध्ये गोळीबार 

शिवराज सणस हे पुणे-स्थित वरिष्ठ पत्रकार आहेत. पुण्यासह महाराष्ट्रातील राजकीय व सामाजिक घडामोडी हे त्यांच्या अभ्यासाचे विषय आहेत.
Exit mobile version