JEE NEET Biometric Attendance: परीक्षा केंद्रावर फेस रेकग्निशन अनिवार्य, फसवणुकीला आळा

JEE NEET Biometric Attendance

पुणे: जेईई (JEE) आणि नीट (NEET) या राष्ट्रीय स्तरावरील प्रवेश परीक्षांमध्ये पारदर्शकता वाढवण्यासाठी नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (NTA) मोठा निर्णय घेतला आहे. २०२६ पासून या परीक्षांमध्ये परीक्षा केंद्रावर बायोमेट्रिक हजेरी (JEE NEET Biometric Attendance) आणि फेस रेकग्निशन तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे.

यामुळे ‘डमी’ उमेदवार बसवण्यासारख्या गैरप्रकारांना आळा बसणार आहे.

नव्या नियमानुसार उमेदवारांना अर्ज भरताना लाइव्ह फोटो अपलोड करणे बंधनकारक असेल. या माध्यमातून उमेदवाराची ओळख आधीच निश्चित केली जाईल.

परीक्षा केंद्रावर प्रवेश करताना उमेदवाराचा चेहरा स्कॅन करूनच प्रवेश दिला जाणार आहे.

JEE NEET Biometric Attendance: राधाकृष्णन समितीच्या शिफारशींनुसार बदल

केंद्र सरकारने स्थापन केलेल्या राधाकृष्णन समितीच्या शिफारशींनुसार हा बदल करण्यात आला असून, याची प्रायोगिक चाचणीही यशस्वीरीत्या पार पडली आहे. दिल्लीतील काही परीक्षा केंद्रांवर UIDAI, NIC आणि NTA यांच्या संयुक्त विद्यमाने फेस रेकग्निशन ऑथेंटिकेशनचा प्रयोग करण्यात आला होता.

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्याने उमेदवाराच्या चेहऱ्याच्या वैशिष्ट्यांचे विश्लेषण करून ओळख पटवली जाणार आहे. गेल्या काही वर्षांत जेईई आणि नीट परीक्षांमध्ये झालेल्या फसवणुकीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.

हेही वाचाः e-Pramaan: एकाच मालमत्तेवर अनेक कर्जांना ब्रेक, नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाचा मोठा निर्णय 

शिवराज सणस हे पुणे-स्थित वरिष्ठ पत्रकार आहेत. पुण्यासह महाराष्ट्रातील राजकीय व सामाजिक घडामोडी हे त्यांच्या अभ्यासाचे विषय आहेत.
Exit mobile version