Shakti Summit 2026 विद्यापीठे, उद्योग आणि संशोधन संस्थांमध्ये भागीदारीची गरजराज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचे प्रतिपादन; हिंदू इकॉनॉमिक फोरम आयोजित ‘शक्ती समिट २०२६’चा समारोप

Shakti Summit 2026

पुणे : (Shakti Summit 2026) “उच्च आणि व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये अफाट क्षमता आहे. त्यामुळे शैक्षणिक संस्थांनी केवळ पदवीधर निर्माण न करता, देशासाठी भावी संशोधक, उद्योजक आणि राष्ट्रनिर्माते घडविण्याची जबाबदारी स्वीकारली पाहिजे. यासाठी विद्यापीठे, उद्योग आणि विविध आर्थिक मंचांमध्ये अधिक सखोल सहकार्य आणि भागीदारीची गरज आहे,” असे प्रतिपादन महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णू देव वर्मा (Jishnu Dev Varma) यांनी पुणे येथे केले.

(Shakti Summit 2026) हिंदू इकॉनॉमिक फोरम Hindu Economic Forum (HEF) (एचईएफ) पुणे डिस्ट्रिक्ट चॅप्टरच्या वतीने पाषाण येथील पुणे इंटरनॅशनल सेंटरमध्ये आयोजित पहिल्या ‘शक्ती समिट २०२६’ या उद्योजकता परिषदेचा समारोप राज्यपाल वर्मा (Jishnu Dev Varma) यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. त्यावेळी ते बोलत होते. 

याप्रसंगी व्यासपीठावर लेफ्टनंट जनरल (निवृत्त) अजयकुमार सिंग, क्विन्टेसेंशियल फ्रॅग्रन्स प्रायव्हेट लिमिटेडचे अध्यक्ष भरत कामठे, ॲक्युरेट ग्रुपचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक किरण जाधव, हिंदू इकॉनॉमिक फोरमचे अध्यक्ष गौरव त्रिपाठी आणि संकेत खरपुडे आदी मान्यवर उपस्थित होते. तत्पूर्वी, महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ ट्रान्सफॉर्मेशनच्या (मित्रा) नियामक मंडळाचे सदस्य दीपक करंजीकर आणि भारत फोर्जचे राजेंद्रसिंह भाटिया यांच्या हस्ते या महत्त्वपूर्ण समिटचे उद्घाटन झाले होते.

बदलत्या जागतिक समीकरणात भारतासमोर मोठ्या संधी

‘शक्ती समिट’ (Shakti Summit 2026) च्या या अभिनव उपक्रमाचे कौतुक करताना राज्यपाल जिष्णू देव वर्मा (Jishnu Dev Varma) म्हणाले, “हे व्यासपीठ उद्योजक, गुंतवणूकदार, संशोधक, स्टार्टअप्स, लघुउद्योग, धोरणकर्ते आणि विचारवंत यांना एकाच छताखाली आणून भारताच्या आर्थिक आणि धोरणात्मक विकासाला नवीन दिशा देणारे ठरेल. ‘धोरणात्मक क्षेत्रांतील संधी’ ही नवीन भारताच्या वाढत्या आकांक्षांचे प्रतीक आहे.” 

पुढे बोलताना राज्यपाल (Jishnu Dev Varma) म्हणाले की, “सध्या जगभरात सुरू असलेले संघर्ष, बदलणारे भू-राजकीय समीकरण आणि जागतिक पुरवठा साखळीतील (Global Supply Chain) बदलांमुळे भारतासमोर विकासाच्या प्रचंड संधी निर्माण झाल्या आहेत. अशा वेळी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), मशीन लर्निंग, सेमीकंडक्टर, इलेक्ट्रॉनिक्स, संरक्षण क्षेत्र, अवकाश तंत्रज्ञान, रोबोटिक्स, प्रगत उत्पादन, ऊर्जा, आरोग्य आणि डिजिटल अर्थव्यवस्था हे केवळ उदयोन्मुख विषय राहिलेले नसून, ते आता भारताच्या राष्ट्रीय सामर्थ्याचे प्रमुख आधारस्तंभ ठरत आहेत. त्यामुळे आत्मविश्वासू, आत्मनिर्भर, तंत्रज्ञानसंपन्न आणि सांस्कृतिक मूल्यांशी जोडलेला भारत उभारण्यासाठी आपण आपली ज्ञान, नावीन्य, संघटनशक्ती आणि उद्यमशीलता राष्ट्रीय हिताशी जोडली पाहिजे.”

शिवरायांच्या प्रेरणेने विकसित भारताचा संकल्प दृढ करा

(Shakti Summit 2026) छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक राज्याभिषेकाच्या ३५० व्या वर्षपूर्तीचे स्मरण करत राज्यपाल (Jishnu Dev Varma) म्हणाले, “शिवरायांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत स्वराज्य उभे केले. तोच आदर्श आणि तीच प्रेरणा डोळ्यांसमोर ठेवून आजच्या भारताने नवसंशोधन, उद्योग आणि राष्ट्रीय बांधिलकीच्या बळावर जागतिक नेतृत्वाकडे वाटचाल केली पाहिजे आणि २०४७ पर्यंत विकसित राष्ट्र बनण्याचा संकल्प अधिक दृढ केला पाहिजे.” 

पुण्याच्या गौरवशाली परंपरेचा उल्लेख करताना ते (Jishnu Dev Varma) म्हणाले, “ज्ञान, शिक्षण, संस्कृती, माहिती तंत्रज्ञान (IT), ऑटोमोबाईल उद्योग, संरक्षण आस्थापने, संशोधन संस्था आणि औषधनिर्माण (Pharma) क्षेत्रातील मजबूत पायाभूत सुविधांमुळे पुणे हे धोरणात्मक उद्योगांचे राष्ट्रीय केंद्र बनण्याची दाट क्षमता बाळगून आहे.”

(Shakti Summit 2026) राज्यपालांनी (Jishnu Dev Varma) पुढे स्पष्ट केले की, विकसित भारताच्या ध्येयामध्ये समाजातील शेवटच्या घटकाचे कल्याण केंद्रस्थानी असले पाहिजे. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्गीय, भटक्या जमाती, महिला आणि युवक यांना विकास प्रक्रियेत समान संधी मिळाल्याशिवाय ‘विकसित भारत’ ही संकल्पना पूर्ण होणार नाही. पूर्वी धोरणात्मक क्षेत्रे केवळ मोठ्या उद्योगसमूहांची मक्तेदारी मानली जात होती, मात्र आता लहान उत्पादन युनिट्सना (MSMEs) संरक्षण क्षेत्राच्या पुरवठा साखळीत सहभागी होण्याची आणि स्टार्टअप्सना कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित उपाययोजना तयार करण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे.

तंत्रज्ञान आणि नागरी-लष्करी संयोग काळाची गरज

कार्यक्रमात (Shakti Summit 2026) बोलताना लेफ्टनंट जनरल (निवृत्त) अजयकुमार सिंग म्हणाले, “भांडवल पुरवणारे, उद्योजक, नवसंशोधक आणि उत्साही युवक-युवती यांना एकत्र आणण्याचे अत्यंत महत्त्वाचे काम या समिटने केले आहे. भारताचा विकास हा संपूर्ण जगाचा विकास असतो, हे भारताने कोरोना महामारीच्या काळात जगाला औषधे आणि लस पुरवून सिद्ध केले आहे. आज युद्धाचे स्वरूप बदलले असून त्यात तंत्रज्ञानाचा वापर प्रचंड वाढला आहे. त्यामुळे नागरी आणि लष्करी क्षेत्रातील सहकार्य (Civil-Military Synergy) वाढविणे अत्यंत गरजेचे बनले असून, त्या दृष्टीने हे समिट महत्त्वाचे पाऊल आहे.”

ॲक्युरेट ग्रुपचे अध्यक्ष किरण जाधव यांनी सांगितले की, “केंद्र सरकारच्या नवीन संरक्षण खरेदी धोरणामुळे सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांना (MSME) मोठा फायदा मिळत आहे. लष्करातील निवृत्त अधिकारी आणि देशातील युवा वर्ग यांच्यात योग्य समन्वय साधल्यास आपल्याला अनेक जटिल समस्यांवर स्वदेशी व प्रभावी भारतीय उपाय शोधणे शक्य आहे.” उद्योजक भरत कामठे यांनीही उद्योजकतेच्या विकासावर आपले विचार मांडले.

संरक्षण, विज्ञान व तंत्रज्ञानावर दिवसभर सखोल मंथन

या एकदिवसीय परिषदेत विविध सत्रांमध्ये देशविदेशातील तज्ज्ञांनी अनेक धोरणात्मक विषयांवर सखोल चर्चा केली. यामध्ये प्रामुख्याने खालील विषयांचा समावेश होता:

संरक्षण व अंतराळ क्षेत्र: ‘रेअर अर्थ’ खनिजांचे भू-राजकीय महत्त्व, संरक्षण क्षेत्रातील उदयोन्मुख तंत्रज्ञान आणि बदलते युद्धतंत्र, तसेच ‘विकसित भारत’ मोहिमेत एमएसएमई (MSME) क्षेत्राची भूमिका.

पायाभूत सुविधा व तंत्रज्ञान: रेल्वे व पायाभूत सुविधा, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि इंटरनेट ऑफ थिंग्ज (IoT) मुळे बदलणारे डिजिटल परिदृश्य.

संस्कृती आणि अर्थकारण: हिंदू मंदिरांचे अर्थकारण आणि ‘ज्ञान, माध्यम व कथानक शक्ती’ (Knowledge, Media, and Narrative Power).

शिक्षण आणि प्रशासन: शिक्षण, पत्रकारिता आणि प्रशासनात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI in Education, Journalism & Governance) वाढता वापर.

शहरी विकास व लॉजिस्टिक्स: नागरी विकास, औद्योगिक पायाभूत सुविधा आणि पुरवठा साखळी व्यवस्थापन (Supply Chain Management).

कार्यक्रमाचे (Shakti Summit 2026) स्वागत प्रास्ताविक हिंदू इकॉनॉमिक फोरमचे अध्यक्ष गौरव त्रिपाठी यांनी केले आणि समारोप सत्रात त्यांनी सर्वांचे आभार मानले. संपूर्ण कार्यक्रमाचे अभ्यासपूर्ण सूत्रसंचालन शुभम कातंगळे यांनी केले. या परिषदेला पुण्याच्या व महाराष्ट्राच्या उद्योग, शिक्षण आणि संशोधन क्षेत्रातील अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हे ही वाचा : Fuel Price Hike अमेरिका-इराण युद्धाची मोठी झळ! १० दिवसांत सलग चौथ्यांदा पेट्रोल-डिझेल महागले; मुंबई, दिल्लीसह तुमच्या शहरातील आजचे नवीन दर जाणून घ्या; सर्वसामान्यांच्या खिशाला मोठी कात्री

Exit mobile version