पुणे : जागतिक पातळीवर पिगमेंट आणि रंगद्रव्ये उत्पादनात आघाडीवर असलेल्या (Sudarshan Chemical Industries ) सुदर्शन केमिकल इंडस्ट्रीज लिमिटेड आणि प्रगत तंत्रज्ञान व व्यवसाय प्रक्रिया व्यवस्थापन क्षेत्रातील आघाडीची संस्था जेनपॅक्ट यांच्या सहकार्याने पुण्यात अत्याधुनिक ग्लोबल कपॅबिलिटी सेंटर (GCC) ची स्थापना करण्यात आली आहे.
(Sudarshan Chemical Industries) सुदर्शन केमिकलच्या वाढत्या जागतिक कार्यपद्धतींना अधिक सुसूत्र, कार्यक्षम आणि तंत्रज्ञान-सक्षम करण्याच्या दृष्टीने हे केंद्र महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.
पुण्यातील बाणेर येथील सुदर्शन केमिकलच्या (Sudarshan Chemical Industries ) जागतिक मुख्यालयात या ग्लोबल कपॅबिलिटी सेंटरचे नुकतेच उद्घाटन करण्यात आले. यापूर्वी जगभरातील विविध देशांमध्ये विभागून कार्यरत असलेली अनेक महत्त्वाची एंटरप्राइज आणि प्रशासनिक कार्ये या केंद्रामध्ये एकत्रित करण्यात आली आहेत. परिणामी, विविध भौगोलिक क्षेत्रांमधील समन्वय अधिक सुलभ होणार असून निर्णयप्रक्रिया, अंमलबजावणी आणि कार्यक्षमतेत लक्षणीय सुधारणा होण्याची अपेक्षा आहे.
उद्घाटनप्रसंगी सुदर्शन केमिकल्सचे (Sudarshan Chemical Industries ) जागतिक अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक राजेश राठी यांनी सांगितले की, “जागतिक विस्तार करत असताना कार्यक्षमतेतील सातत्य, वेगवान निर्णयक्षमता आणि उत्कृष्ट अंमलबजावणी हेच स्पर्धात्मक यशाचे खरे सूत्र असते. पुण्यात स्थापन करण्यात आलेले हे ग्लोबल कपॅबिलिटी सेंटर प्रक्रियांची कार्यक्षमता वाढवेल, ग्राहकांना अधिक जलद व दर्जेदार सेवा देण्यास मदत करेल आणि संपूर्ण संस्थेमध्ये सातत्यपूर्ण सुधारणा व ग्राहक-केंद्रित संस्कृती अधिक बळकट करेल.”
२०२५ मध्ये जर्मनीतील ह्युबॅक ग्रुपच्या अधिग्रहणानंतर सुदर्शन केमिकल्सचा (Sudarshan Chemical Industries ) जागतिक विस्तार मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. त्या पार्श्वभूमीवर हे नव्याने स्थापन झालेले GCC सेंटर कंपनीच्या ‘खऱ्या अर्थाने जागतिक पिगमेंट कंपनी’ बनण्याच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण टप्पा मानले जात आहे. हे केंद्र भारताबाहेरील सुदर्शन केमिकल्सच्या विविध जागतिक कार्यपद्धतींना पाठबळ देणार असून भविष्यातील ऑटोमेशन, प्रमाणित प्रक्रिया आणि डिजिटल क्षमतांचा विस्तार यासाठी भक्कम पाया निर्माण करणार आहे.
यावेळी जेनपॅक्टचे उत्पादन क्षेत्रासाठीचे जागतिक व्यवसाय प्रमुख दिवाकर सिंगल म्हणाले, “सुदर्शन केमिकल्सच्या (Sudarshan Chemical Industries ) ग्लोबल कपॅबिलिटी सेंटरमुळे आमच्यातील दीर्घकालीन भागीदारीला नवी दिशा मिळाली आहे. केमिकल उत्पादन क्षेत्रातील आमचा अनुभव, प्रक्रिया बुद्धिमत्ता आणि एआय-आधारित तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सुदर्शन केमिकल्सची प्रशासनिक क्षमता आणि जागतिक अंमलबजावणी अधिक सक्षम करण्याचा आमचा प्रयत्न आहे.”
पुण्यातील या नव्या ग्लोबल कपॅबिलिटी सेंटरमुळे केवळ सुदर्शन केमिकल्सच्या (Sudarshan Chemical Industries ) जागतिक कार्यपद्धतींनाच नव्हे, तर पुणे शहराच्या औद्योगिक आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील महत्त्वालाही आणखी चालना मिळणार असल्याचे उद्योगक्षेत्रातून बोलले जात आहे.
1 Comment